
नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेसनापूर्वी पंतप्रधान मोदी यांच्या होण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आपल्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची अधिक शक्यता आहे. या नव्या मंत्र्यांमध्ये मित्रपक्षांच्या मंत्र्यांचा मोठ्या संख्येने समावेश होऊ शकतो. या वर्षी ३० मे या दिवशी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी बनविलेल्या नव्या टीममध्ये जेडीयू पक्षाचा एकही मंत्री नव्हता. या बरोबरच शिवसेनेला देखील एक प्रकारे प्रतिकात्मक प्रतिनिधीत्व मिळाले होते. मित्रपक्षांच्या कोट्यातून आणखी काहींची वर्णी मंत्रिपदावर लावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आपल्या दुसऱ्या कार्यकालात मंत्र्यांनी आतापर्यंत केलेल्या कामांची समीक्षा करणार आहेत. याच आधारे संभाव्य फेरबदल होतील अशी चर्चा आहे. १८ नोव्हेंबरला सुरू होणार आहे. तर अधिवेशनाची सांगता १३ डिसेंबरला होणार आहे. वाचा- नोकरशाहीत होणार मोठे बदल महाराष्ट्र आणि हरयाणाच्या विधानसभा निवडणुकांची धामधूम संपल्यानंतर मोदी सरकारने नोकरशाहीमघ्ये मोठे बदल केले. मंगळवारी ११ सचिवांसह २२ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. गेल्या काही महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या कर्मचारी निवड आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. अधिसूचना जारी करत जम्मू आणि काश्मीर कॅडरचे आयएएस ब्रजराज शर्मा यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. वाचा- परीक्षेत गडबड आणि इतर अनेक तक्रारींमुळे हा आयोग विद्यार्थ्यांच्या निशाण्यावर होता. या व्यतिरिक्त संजीव नंदन सहाय यांची नियुक्ती उर्जा सचिव पदावर करण्यात आली आहे. एनएचएआयचे अध्यक्ष एन. एन. सिन्हा यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अद्याप कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या काही दिवसांमध्ये आणखी बदल होणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकालात पंतप्रधान कार्यालयाच्या टीमची नव्याने बांधणी करण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत महत्त्वाच्या विभागांच्या सचिवांच्या बदल्या झालेल्या नाहीत.