रणवीर सिंह म्हणतो, बायकोकडून 'हे' शिकलो! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 22, 2019

रणवीर सिंह म्हणतो, बायकोकडून 'हे' शिकलो!

https://ift.tt/2W2MxKl
मुंबई: बॉलिवूडमधील अनेकांची आवडती जोडी म्हणजे आणि ...पुरस्कार सोहळे असो किंवा फिल्म प्रमोशन हे दोघेही एकमेकांचे कौतुक करायला थकत नाहीत. रणबीरनं अलीकडेच आपल्या पत्नीचं कौतुक करत तिच्याकडून तो सध्या वेळेचं नियोजन कसं करायचं याचे धडे गिरवत असल्याचं सांगितलंय. रणवीर सिंग आणि दीपिका पडुकोण यांच्या लग्नाला नोव्हेंबरमध्ये एक वर्ष पूर्ण होतंय. दीपिकाकडून काय शिकायला मिळतं, असं विचारल्यावर रणवीर म्हणाला, की वेळेचं नियोजन कसं करायचं असतं याचे हे मी दीपिकाकडून शिकत आहे. तो म्हणाला, 'सध्या मी कामांमध्ये खूप व्यग्र असतो. त्यामुळे कामाशिवाय मला आवडतील, आनंद देतील अशा गोष्टी करण्याची मला फारशी संधी मिळत नाही. माझी याबद्दल काही तक्रार नाहीए... मी जे काही करतो, ते मनापासून करतो. मला माझं काम आवडतं. पण संसार आणि करिअर यामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न मी सध्या करतोय. जेव्हा मला वेळेचं नियोजन करायचं असतं, तेव्हा मी दीपिकाकडून सल्ले घेत असतो. कारण वेळेचं काटेकोर नियोजन करण्यात दीपिका पटाईत आहे. तिच्याकडून हे शिकण्यासारखं आहे. मी सध्या तिच्याकडून वेळेच्या नियोजनाचे धडे गिरवतोय आणि हळूहळू माझ्यात सुधारणा होते आहे. ' असं रणवीर म्हणाला. रणवीर एरव्ही त्याच्या आयुष्यातील वेळेचं गणित कसं ठरवतो याबद्दल त्याला विचारलं असता तो म्हणाला, 'माझ्या आयुष्यातील वेळेची गणितं सतत बदलत असतात. काही दिवस असं होतं की की वेळ अगदी संथ गतीने जातोय आणि मी कंटाळलो पण काही दिवस असेही असतात ज्यावेळी मला इतकं काम असतं की वेळ कसा जातो ते समजत नाही. ' लवकरच ही बहुचर्चित जोडी '८३' या चित्रपटामध्ये एकत्र झळकणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार यांच्यावर आधारित '८३' हा चरित्रपट आहे. या चरित्रपटात ही जोडी पती-पत्नी म्हणूनच दिसणार आहे. रणवीर या सिनेमात कपिल देव यांच्या भूमिकेत असून, दीपिका त्यांच्या पत्नीची भूमिका साकारतेय. याबाबत बोलताना दीपिका म्हणाली की, 'कबीर खान यांनी मला ही भूमिका साकारायला सांगितली याबद्दल मला आनंद आहे. काही महिन्यांपूर्वीच हे ठरले होते, मात्र मी छपाकच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने आम्ही त्याची अधिकृत घोषणा केली नव्हती. मी या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न करेन' असंही ती म्हणाली.