रहमान नाव ऐकून अंत्यसंस्कारासाठी मिळाला नकार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 22, 2019

रहमान नाव ऐकून अंत्यसंस्कारासाठी मिळाला नकार

https://ift.tt/2Jb2xF0
कोलकाता: धर्म हिंदू नाही असे कारण देत कोलकात्यातील गरिया भागातील एका हिंदू स्मशानभूमीत (६९) या महिलेवर अत्यसंस्कार करण्यास नकार देण्यात आला. जन्माने हिंदू असलेल्या अदिती यांनी यांच्याशी विवाह केला. त्यानंतर अदिती यांनी धर्मांतर करून त्या मुसलमान बनल्या. प्रेमामुळे अदितींनी आपला धर्म बदलला खरा, मात्र त्या हिंदू देवी-देवतांचीच पूजा करत राहिल्या. त्यांची श्रद्धा बदलली नाही. याच कारणामुळे आपल्यावर हिंदू पद्धतीनुसारच अंत्यसंस्कार करण्यात यावेत अशी त्यांची इच्छा होती. मुकुलेश्वर आणि त्यांच्या मित्रांनी गरिया स्मशानभूमीतील सर्व कर्मचाऱ्यांना सर्वकाही समजावून सांगितले. त्या नंतरही त्यांना वाईच अनुभवांनाच समोरे जावे लागले. शेवटी त्यांनी वॉर्ड ११० मधून टीएमसी पार्षद अनूप चक्रवर्ती यांच्याकडे मदत मागितली. चक्रवर्ती यांनी या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास अदिती यांची अतिंम इच्छा पूर्ण होऊ शकली. 'कृष्ण आणि गणपतीला मुलांसारखे मानले' रहमान दांपत्याला मुलबाळ नव्हते. मात्र अदिती या भगवान श्रीकृष्ण आणि गणपती यांची सेवा आपल्या मुलांप्रमाणे करत असत. त्यांनी आपला संपूर्ण वेळ देवाच्या सेवेतच घालवला. अदितीनेतच आपल्याला धार्मिक कार्य करण्याचे शिकवले असे डबडबत्या डोळ्यांनी मुकुलेश्वर सांगतात. आता ती मला सोडून गेली आहे. मी माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत तिच्या पावलांवर पाऊल ठेवूनच चालेन असेही ते पुढे म्हणाले. सन १९८४ मध्ये झाला होती अदिती चौधरी यांचा विवाह सन १९७७ मध्ये कोलकात्यातील अलीपूर येथील नॅशनल लायब्ररीमधील अभ्यासिकेत २४ परगना येथील रहिवासी असलेले मुकुलेश्वर रहमान यांची अदिती यांच्याशी ओळख झाली. अदिती या डायमंड हार्बर भागात राहत असत. यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. दोघांनी सर्व प्रकारची धार्मिक बंधने तोडून, तसेच आपल्या कुटुंबीयांच्या विरोधाचा सामना करत अदिती आणि मुकुलेश्वर यांनी सन १९८४ मध्ये विवाह केला. हे दोघे एकमेकांसाठीच बनले होते, असे आसपासचे लोक त्यांच्याविषयी बोलत असत. हे दांपत्य नेहमीच आनंदी आणि शांततेने आपले जीवन जगत होते. एक संशोधक असूनही अदिती यांनी देशातील विविध शाळांमध्ये मुलांना शिकवले आहे. तर त्यांचे पती मुकुलेश्वर यांन अनेक खासगी कंपन्यांमध्ये मोठ्या हुद्द्याच्या जागांवर काम केले आहे. ... आणि झाले अंत्यसंस्कार अदिती यांच्या कुटुंबीयांनी माहिती दिल्यानंतर हे प्रकरण काय आहे याची पूर्ण कल्पना तृणमूल काँग्रेसचे नगरसेवक अनूप चक्रवर्ती सांगतात. या प्रकरणी त्यांनी कोलकाता महानगरपालिकेचे उममहापौर अतिन घोष यांची सल्ला घेतला. त्यावर कोणत्याही धर्माच्या व्यक्तीवर हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाऊ शकतात, अशी माहिती उपमहापौर घोष यांनी चक्रवर्ती यांना सांगितले. त्यानंतर चक्रवर्ती यांनी गरिया स्मशानभूमीतील अधिकाऱ्यांना फोन करून चर्चा केली आणि लवकरात लवकर अदिती रहमान यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करावेत असे निर्देश दिले. त्यानंतर अदिती यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.