विधानसभा निवडणूक निकाल: ठळक वैशिष्ट्ये - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 24, 2019

विधानसभा निवडणूक निकाल: ठळक वैशिष्ट्ये

https://ift.tt/2pP2ckm
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे प्राथमिक कल हाती आले असून त्यानुसार भाजप, शिवसेना पुन्हा सत्ता राखताना दिसत आहे. मात्र, भाजपला मागील वेळेपेक्षा कमी जागांवर यश मिळाल्याचं दिसत आहे. तर, शिवसेनेनं युतीमध्ये कमी जागा घेऊनही मुसंडी मारली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीनंही जोरदार लढत देत 'कमबॅक' केलं आहे. विधानसभा निवडणूक निकालाची ठळक वैशिष्ट्ये: >> पुणे: कसबा मतदारसंघातून भाजप उमेदवार मुक्ता टिळक विजयी>> विधानसभा निवडणूक: अमळनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भाईदास पाटील विजयी>> विधानसभा निवडणूक: पळूस-कडेगाव मतदारसंघातून काँग्रेसचे डॉ. विश्वजीत कदम १ लाख ५५ हजार मतांनी विजयी >> विधानसभा निवडणूक आघाडी: राष्ट्रवादीचे शेखर निकम चिपळूणमधून विजयी >> विधानसभा निवडणूक आघाडी: भाजप- १०१ जागा, काँग्रेस- ५३ जागा, शिवसेना- ६३ जागा >> बीड: परळीत भाजपच्या पंकजा मुंडे यांना धक्का; राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे २१ हजार मतांनी आघाडीवर >> काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची उत्तम कामगिरी; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा करिष्मा राज्यात कायम असल्याचं स्पष्ट >> भाजप-शिवसेनेनं सत्ता राखली, पण भाजपची घसरगुंडी