मला हरवायला ठाकरेंना पैसा वाटला: बिचुकले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 22, 2019

मला हरवायला ठाकरेंना पैसा वाटला: बिचुकले

https://ift.tt/2W2sStY
मुंबई: 'बिचुकलेला हरवायला ठाकरे कुटुंबीयांना पैसा वापरावा लागला' असा खळबळजनक आरोप 'बिग बॉस' फेम कवी मनाचे नेते अभिजीत बिचुकलेंनी केला आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत अभिजीत बिचुकलेंनी वरळीत युवासेना प्रमुख यांना आव्हान दिलं होतं. यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ठाकरे कुटुंबीयांवर हे आरोप केले आहेत. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने वरळीतून तब्बल चार कोटींची रक्कम जप्त केली. ही रक्कम अभिजीत बिचुकलेंना हरवण्यासाठी वापरण्यात आल्याचा दावा त्यांनी या मुलाखतीत केला आहे. 'वरळीतून मी उमेदवारी अर्ज भरला... मी मुंबईत आलो, मला मुंबईकरांनी प्रचंड प्रेम दिलं. माझी लोकप्रियता पाहून आदित्य ठाकरे घाबरले आणि त्यांनी मला पाडण्यासाठी पैसे वाटले.' असं बिचुकले म्हणाले. राजकारणातील नेते हेच सगळ्यात मोठे अभिनेते असतात असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. हे राजकीय नेते गंडवागंडवी करतात...लोकांना फसवतात असं म्हणत उद्धव ठाकरे पण असेच अभिनेते आहेत असं बिचुकले म्हणाले. १० रुपयात ते कशी थाळी देतात हे मला पाहायचेच आहे असंही त्यांनी ठामपणे सांगितले. एकीकडे ठाकरे कुटुंबीयांवर टीका करत असताना दुसरीकडे मात्र ते आदित्य ठाकरेंविरोधात निवडणुकीला उभं राहिल्यानंतर शिवसेनेकडून किंवा ठाकरे कुटुंबीयांकडून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकण्यात आला नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही हे मात्र त्यांनी कबूल केले. दरम्यान, अभिजीत बिचुकले यांनी वरळी मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि ठाकरे कुटुंबीयांना आव्हान दिलं. मीच छत्रपतींचा खरा वारसदार आहे असं म्हणत आदित्यला काय कमी आहे? त्यामुळे त्यांनी निवडणूक का लढवावी? असा सवालही अभिजीत बिचुकलेंनी उपस्थित केला. ' माझ्यामुळे आदित्य समोरचं आव्हान वाढलं आहे. तुम्ही मला निवडून द्या मी प्रशासनाला एका दिवसात सरळ करतो' असंही बिचुकले म्हणाले. अभिजीत बिचुकले साताऱ्यातूनही लढवली. भाजपचे उमेदवार शिवेंद्रराजे यांच्याविरोधात बिचुकलेंनी अर्ज दाखल केला होता. इतकंच नव्हे तर त्यांची पत्नी अलंकृता बिचुकले भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेल्या उदयनराजेंविरोधात लोकसभेची पोटनिवडणूक लढविली.