बगदादीचा खात्मा, अमेरिकेकडून व्हिडीओ जारी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 31, 2019

बगदादीचा खात्मा, अमेरिकेकडून व्हिडीओ जारी

https://ift.tt/31USt9K
वॉशिंग्टन : अमेरिकन सैन्याने आयसिसचा प्रमुख अबू बक्र अल बगदादीला मारल्याचा व्हिडीओ जारी करत ऑपरेशनची पुष्टी केली आहे. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार बगदादीचा दफनविधीही समुद्रात करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली. यासोबतच अमेरिकन सैन्याने कशा पद्धतीने छापा टाकला याचा छोटासा व्हिडीओ अमेरिकेकडून जारी करण्यात आला आहे. काही सैनिक बगदादी राहत असलेल्या ठिकाणी हल्ला करण्याची तयारी करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. उत्तर सीरियामध्ये बगदादीच्या ठिकाण्यांवर हा हल्ला करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. अमेरिकन मध्यवर्ती कमांडचे प्रमुख जनरल फ्रँक मॅकेंझी यांनी आपल्या सैन्याचं कौतुक करत या पूर्ण ऑपरेशनची माहिती दिली. सर्व लोकांना बाहेर काढल्यानंतरच बगदादीच्या ठिकाण्यांवर हल्ला करण्यात आला, असं ते म्हणाले. बगदादी त्याच्या अखेरच्या क्षणाला रडून जीवाची भीक मागत होता, असा दावाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. पण या व्हिडीओमधून अशी कोणतीही पुष्टी करण्यात आली नाही. बगदादीसह दोन लहान मुलांचाही दफनविधी करण्यात आला. ही तीन मुलं असल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलं होतं, पण विश्लेषणानंतर १२ वर्षीय दोन मुलं असल्याचं समोर आलं. शनिवारी सायंकाळी अमेरिकन सैन्याने उत्तर पश्चिम सीरियामध्ये इदलिब प्रांतातील बारिशा गावात बगदादीच्या ठिकाण्यांवर हल्लाबोल केला होता. कसं झालं ऑपरेशन? अमेरिकेच्या 'सीआयए' या गुप्तचर संस्थेसह स्थानिक संघटनांकडून बशिरा या उपनगरात 'आयएस'शी संबंधित दहशतवाद्यांच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली होती. ट्रम्प यांच्या मंजुरीनंतर या भागावर विशेष लक्ष ठेवण्यात आले होते. बगदादीची ठोस माहिती हाती आल्यानंतर गुप्त नियोजन करून, ही कारवाई करण्यात आली. हेलिकॉप्टरने कमांडोंच्या तुकडीला या ठिकाणी उतरविण्यात आले. या तुकडीने एक घर आणि कारवर लक्ष केंद्रीत केले आणि कामगिरी फत्ते केली, अशी माहिती 'सीरियन ऑब्जर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्स'ने दिली आहे. 'या भागामध्ये रात्री हेलिकॉप्टरचे आवाज आले आणि त्यानंतर गोळीबारही सुरू झाला. या भागात आम्ही गेलो, तर तेथील घर उद्ध्वस्त झाले होते. त्यासमोरील तंबू आणि वाहनही पूर्णपणे नष्ट झाले होते. त्या ठिकाणी असलेल्या कारमधील दोघांचा मृत्यू झाला,' असे अब्देल हमीद या स्थानिक रहिवाशाने सांगितले. या कारवाईमध्ये या कारवाईमध्ये 'आयएस'चा आणखी एक म्होरक्या अबू यमान याच्याबरोबरच दोन महिला ठार झाल्या असून, त्या बगदादीच्या बायका असल्याचे सांगण्यात येते.