Live: मुंबईवर कोणाचा वरचष्मा राहणार? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 24, 2019

Live: मुंबईवर कोणाचा वरचष्मा राहणार?

https://ift.tt/31DmXNr
मुंबई: दोन दिवसांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. देशाला दिशा दाखवणाऱ्या या राज्यावर सत्ता कुणाची याचा फैसलाही मतमोजणीनंतर होणार आहे. मात्र, सर्वाधिक लक्ष असेल ते मायानगरी मुंबईवर. मुंबईवर कोणाचा राजकीय वरचष्मा राहणार हेही या निकालांतून समजणार आहे. दुपारी साधारणत: १२ वाजेपर्यंत हे चित्र स्पष्ट झालेलं असेल. पाहूयात या निकालाचे क्षणोक्षणीचे LIVE अपडेट्स.... लाइव्ह अपडेट्स: >> थोड्याच वेळात पोस्टल मतदानाला सुरुवात >> मुंबईतील अमराठी मते कोणाच्या पारड्यात; भाजप, काँग्रेसमध्ये चुरस >> मुंबईत जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी शिवसेना-भाजपमध्येही असेल चुरस >> मुंबईवर कोणाचा वरचष्मा राहणार, याचंही उत्तर मिळणार >> महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा आज निकाल