
नाशिक: दोन दिवसांपूर्वी झालेल्या राज्यविधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. देशाला दिशा दाखवणाऱ्या या राज्यावर सत्ता कुणाची याचा फैसलाही मतमोजणीनंतर होणार आहे. जागांचे निकाल पहिल्या फेरीच्या मतमोजणीला काहीसा उशीर होणार असला तरी नंतरच्या फेऱ्या वेगानं पूर्ण होतील. उत्तर महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण ३५ जागा आहेत. उत्तर महाराष्ट्रात विद्यमान मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री छगन भुजबळ आणि भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या डॉ. रोहिणी खडसे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळं दुपारी साधारणत: १२ वाजेपर्यंत राज्याच्या नव्या विधानसभेचं चित्र स्पष्ट झालेलं असेल. पाहूयात या निकालाचे क्षणोक्षणीचे LIVE अपडेट्स.... >> मतमोजणीला झाली सुरुवात >> नाशिक पूर्व मतदारसंघ: भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेलेले आमदार बाळासाहेब सानप आणि मनसे मधून ऐनवेळी भाजपमध्ये गेलेले राहुल ढिकले यांच्यामध्ये मुख्य लढत >> काँग्रेसचे चिन्ह घेऊन जोगेंद्र कवाडे गटाचे गणेश उन्हवणे रिंगणात >> काही क्षणात येणार निकालाचा पहिला कल हाती >> प्रशासन मतमोजणी साठी सज्ज >> छगन भुजबळ, दादा भुसे, देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप, योगेश घोलप या दिग्गजासह १४८ उमेदवारांचा होणार फैसला >> उत्तर महाराष्ट्रातील ३५ विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात होणार सुरुवात >> आज मतमोजणीसाठी नाशिक शहरात ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. >> उत्तर महाराष्ट्रात विद्यमान मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री छगन भुजबळ आणि भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या डॉ. रोहिणी खडसे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची >> उत्तर महाराष्ट्रातील एकूण ३५ जागांपैकी जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी भाजपम राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असेल चुरस >> उत्तर महाराष्ट्रावर कोणाचा वरचष्मा राहणार, याचंही उत्तर मिळणार >> वाचा- >> महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा आज निकाल