Live: ठाणे, कोकण निवडणूक कौल कोणाच्या बाजूने? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 24, 2019

Live: ठाणे, कोकण निवडणूक कौल कोणाच्या बाजूने?

https://ift.tt/2N5zyUc
ठाणे: दोन दिवसांपूर्वी झालेल्या महाराष्ट्रविधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. देशाला दिशा दाखवणाऱ्या या राज्यावर सत्ता कुणाची याचा फैसलाही मतमोजणीनंतर होणार आहे. कोकणात झालेल्या शिवसेना व राणे कुटुंबीयांतील लढतीत कोण बाजी मारणार?, तसंच, मुंबईनंतर शिवसेनेचा गड असलेल्या ठाण्याची तटबंदी अभेद्य राहणार का, हे निकालानंतर समोर येणार आहे. पाहूयात या निकालाचे क्षणोक्षणीचे LIVE अपडेट्स... >> थोड्याच वेळात पोस्टल मतदानाला सुरुवात; पोस्टल मतदानानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी >> अविनाश जाधव यांच्या रूपानं मनसे ठाण्यात शिरकाव करणार का, याचंही उत्तर आज मिळणार >> शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात कोण बाजी मारणार? याबद्दलही उत्सुकता >> महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आज निकाल; उत्सुकता शिगेला