शिवसेनेला एनडीएतून काढणारे तेव्हा गोधडीत होते: राऊत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 18, 2019

शिवसेनेला एनडीएतून काढणारे तेव्हा गोधडीत होते: राऊत

https://ift.tt/32Pth4Y
मुंबई: संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा () घटक पक्ष असलेल्या शिवेसेनेला संसदेत विरोधी बाकांवर बसण्याची व्यवस्था करण्यात आल्यामुळे भारतीय जनता पक्षावर चांगलीच नाराज झाला आहे. शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढणे हा निव्वळ योगायोग नसून ते कौर्य आहे, असे म्हणत शिवसेना हा एनडीएचा एक संस्थापक पक्ष असून, कुणाच्या सहीने शिवसेनेला एनडीतून बाहेर काढले, असा थेट सवाल शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार यांनी भाजपला विचारला आहे. शिवसेना हा संयुक्त पुरोगामी आघाडीत () जाणार नसल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे. 'एनडीए स्थापन झाली तेव्हा हे गोधडीत होते' शिवसेना हा एनडीएचा एक संस्थापक पक्ष आहे. त्यावेळी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृ्ष्ण आडवाणी, जॉर्ज फर्नांडीस अशा ज्येष्ठ नेत्यांनी एनडीए स्थापन केली. जॉर्ज फर्नांडिस हे एनडीएचे निमंत्रक होते. आता कोण नेते राहिले आहेत,असे सांगत जेव्हा एनडीए स्थापन झाली तेव्हा हे गोधडीत होते, असा टोला राऊत यांनी भारतीय जनता पक्षातील विरोधकांना लगावाला आहे. आता टिवटिव करणाऱ्यांचा एनडीएशी काहीही संबंध नाही. शिरोमणी आकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल हे सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. शिवसेनेला एनडीएबाहेर काढताना बादल यांना विचारले होते का?, इतरही अनेक घटक पक्ष आहेत, या सर्व घटक पक्षांना विचारले का?, असे सवाल राऊत यांनी उपस्थित केले आहेत. शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्याचा निर्णय हा एनडीएच्या बैठकीत झालेला नाही. हा निर्णय एनडीएच्या बैठकीत झाला असता, तर आम्ही आमची भूमिका मांडली असती असही राऊत म्हणाले. संसदीय कामकाज मंत्री, प्रल्हाद जोशी यांनी शिवसेनेची संसदेत बसण्याची जागा विरोधी बाकांवर करण्यात आल्याची माहिती काल पत्रकारांशी बोलताना दिली. त्यानंतर शिवसेना हा पक्ष एनडीएतून बाहेर पडला असल्याचे भारतीय जनता पक्षाने अधिकृतपणे जाहीर झाली. लोकसभेत शिवसेनेचे एकूण १८ खासदार असून शिवसेनेची राज्यसभेतील खासदाराची संख्या आहे ३. लोकसभेत भारतीय जनता पक्षाकडे बहुमत असले, तरी देखील राज्यसभेत भाजपला शिवसेनेची मदत लागू शकते. यामुळे अडचणीच्या काळात शिवसेना राज्यसभेत वेळोवेळी कोणती भूमिका घेणार हे पाहणे औत्सुत्याचे ठरणार आहे.