शिवना नदीत अडकलेल्या वाघाचा अखेर मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 7, 2019

शिवना नदीत अडकलेल्या वाघाचा अखेर मृत्यू

https://ift.tt/36Cuujj
नागपूर: जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील जूना कुनाडा गावात असलेल्या शिवना नदी पात्रातील दोन दगडांच्या फटीत अडकलेल्या वाघाचा अखेर मृत्यू झाला आहे. अडकलेला वाघ पाहण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. दरम्यान, वन विभागाच्या रेस्क्यू टीमकडून या वाघाला वाचवण्याचे प्रयत्न सुरुच आहेत. पुलावरून उडी मारल्याने हा वाघ जखमी झाला होता. शिवना नदीतील फटीत हा वाघ अडकून पडला होता. या वाघाला कमरेजवळ दुखापत झाल्याने तो जायबंदी झाला होता. या वाघाने आठवडाभरापासून चारगाव, कुनाडा, देऊरवाडा भागात दहशत निर्माण केली होती. चारगाव(सातपुते) खेड्यात असलेल्या तेलवासा ओपन कास्ट खाणीजवळ नागराव पाटील टेकम या शेतकऱ्याच्या शेताजवळ दोनच दिवसांपूर्वी या वाघाने बैलावर हल्लाही केला होता. त्यात बैल गंभीर जखमी झाला होता. हा वाघ मादीच्या शोधात या परिसरात फिरत होता अशी माहिती मिळत आहे. मात्र, पुलावरून उडी मारून पलिकडे जाण्याच्या प्रयत्नात असताना हा वाघ शिवना नदीतील दगडांच्या फटीत अडकला. त्याला जबर मारही बसला. वाघ अडकला असल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती म्हैसेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अडकलेला वाघ पाहण्यासाठी लोकांनी इथे मोठी गर्दी केली होती. म्हैसकर यांनी लोकांना दूर करत परिस्थिती नियंत्रणात आणली. तेव्हा पासून या वाघाला वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. वाघ अडकलेल्या ठिकाणी जाणे अत्यंत कठीण असल्याने वाघाला वाचवणे सोपे नव्हते. तिथे जाण्यासाठी मार्ग नसल्याने वन विभागाने क्रेनची मदत घेतली. वन विभागाने क्रेनला पिंजरा बांधून नदीत सोडला. वाघ पिंजऱ्यात यावा म्हणून पिंजऱ्यात कोंबड्या ठेवण्यात आल्या होत्या. पण, हा वाघ जखमी झाल्यामुळे त्याला चालता येत नव्हते. काही वेळानंतर वाघाने त्या दगडांच्या फटीमधून स्वतःची सुटका करुन घेतली देखील, मात्र चालता येत नसल्याने तो बाजूला असलेल्या नाल्यात जाऊन फसला होता. काल अंधार झाल्यानंतर वाघाला वाचवण्याचे प्रयत्न वनविभागाला थांबवावे लागले. मात्र आज सकाळी बचावकार्य सुरू होण्यापूर्वीच हा वाघ नदीत मरण पावला.