महामार्गांवर फास्टॅग १ डिसेंबरपासून बंधनकारक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 22, 2019

महामार्गांवर फास्टॅग १ डिसेंबरपासून बंधनकारक

https://ift.tt/2KL5nkK
नवी दिल्लीः राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक आणि नागरिकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. देशभरात १ डिसेंबरपासून बंधनकारक करण्यात आलंय. यापर्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) नागरिकांच्या सुविधेसाठी १ डिसेंबरपर्यंत मोफत फास्टॅग देणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील देशभरातल्या सर्व ५३७ टोल नाक्यांवर तसंच महामार्गांलगत असलेल्या शॉपिंग मॉलमध्ये हा फास्टॅग मोफत देण्याची प्राधिकरणाची योजना आहे. यासोबतच ट्रान्सपोर्ट कंपन्यांच्या कार्यालयांमध्येही हे फास्टॅग मोफत देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे देण्यात येणाऱ्या मोफत फास्टॅगसाठी नागरिकांना केवायसी भरण्याची आवश्यता नाही. हे फास्टॅग ट्रक, कार, जीपसह सर्व वाहनांसाठी १ डिसेंबरपर्यंत मोफत देण्यात येतील. पण बँका आणि संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या फास्टॅगसाठी केवायसी भरावा लागणार आहे. फास्टॅगद्वारे पेट्रोल भरा आणि पार्किंगही करा विमानतळ, शॉपिंग मॉल आणि पेट्रोल पंपावर फास्टॅगद्वारे इंधन भरण्यासाठी सुविधाही देण्याचा सरकारचा विचार असल्याचं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं होतं. यानुसार हैदराबाद विमानतळावर पार्किंगची सुविधा देण्यात आलीय. इथं फास्टॅगद्वारेच पार्किंग आणि पेट्रोल-डिझेलचे पैसे घेतले जात आहेत. यामुळे नागरिकांचा मोठा वेळ वाचणार आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत फास्टॅगची संख्या वाढेल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे देशात १ लाख ४० हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. प्राधिकरणाकडून २०१७मध्ये ७ लाख फास्टॅग देण्यात आलेत. यावर्षी आतापर्यंत ६६ लाख १९ हजार फास्टॅग देण्यात आलेत. ३० नोव्हेंबरपर्यंत यात मोठी भर पडणार आहे. देशातील ४१२ टोल नाक्यांवर फास्टॅग देशभरात राष्ट्रीय प्राधिकरणाचे एकूण ५३७ टोल नाके आहेत. यापैकी ४१२ टोल नाक्यांवरील सर्व लेन फास्टॅगने संचलित करण्यात आल्या आहेत. व्यावसायिक वाहनांची समस्या दूर करण्यासाठी जीएसटीचीसोबतही करार करण्यात आला आहे. व्यावसायित वाहनांचे टॅगसोबत जीएसटीही कापला जाणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे. काय आहे फास्टॅग सुविधा? फास्टॅग हा रेडिओ फ्रिक्वेन्सी टॅगसारखा आहे. गाडीच्या पुढच्या काचेवर बाजूला हा टॅग लावण्यात येतो. वेळोवेळी हा फास्टॅग रिचार्ज करावा लागतो. या फास्टॅगमुळे गाडीला टोल नाक्यावर थांबण्याची गरज पडत नाही. कॅमेऱ्याद्वारे हा फास्टॅग स्कॅन होऊन त्यातील टोलचे पैसे कापले जातात. कुठे मिळेल फास्टॅग? > राज्यातील आरटीओ कार्यालयांत > शॉपिंग साइटवरून ऑनलाइन खरेदी करता येणार > माय फास्टॅग अॅप (MYFASTag App)वरून फास्टॅग कुठे मिळेल याची माहिती घेता येते. > अॅपद्वारे फास्टॅग ऑनलाइन रिचार्जही करता येतो. > देशात २८, ३७६ केंद्रांद्वारे फास्टॅगची विक्री करण्यात येतेय. > २३ बँकांना फास्टॅग सुविधेशी जोडण्यात आलंय. टोल फ्री क्रमांकावर तक्रार करा > राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅगची माहिती पुरवण्यासाठी (NHAI) १०३३ हा टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. > या क्रमांकावर फास्टॅगसंबंधी तक्रारही दाखल करता येणार आहे. > ८ ते १४ नोव्हेंबपरदरम्यान या टोल फ्री क्रमांकावर ५६५३ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यापैकी ५३०१ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.