तापसी पन्नूने सांगितले तिचे 'वाईट' को-स्टार्स! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 22, 2019

तापसी पन्नूने सांगितले तिचे 'वाईट' को-स्टार्स!

https://ift.tt/2XyYQis
मुंबई: अभिनेत्री तापसी पन्नूने आतापर्यंत बॉलिवूड सिनेमांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका करून आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली आहे. याव्यतिरिक्त तापसी तिच्या सहकलाकारांसोबत तिच्या असलेल्या बाँडिंगमुळेही ओळखली जाते. पण अलीकडेच तापसीने एका मुलाखतीत सांगितलं की तिला तिचे कोणकोणते सहकलाकार आवडले नाहीत. अभिनेत्री नेहा धुपिया हिच्या एका चॅट शोमध्ये तापसी बोलत होती. तिने तिला तिचे कुठले सहकलाकार आवडले नव्हते ते सांगितलं. त्यांची नावं ऐकाल तर चक्रावून जाल. तापसीने तिच्यासोबत 'मनमर्जिया' या सिनेमात काम करणारा विकी कौशल, 'जुडवा २' मधील सहकलाकार जॅकलिन यांची नावं घेतली! तिला या कलाकारांसोबत काम करताना काय रुचलं नाही हेही तिने सांगितलं. तापसी म्हणाली, 'जॅकलिनकडे खूप हॉट शरीर आहे आणि याच कारणाने मला 'जुडवा २' मध्ये तिचा सामना करणं कठीण जात होतं.' विकीच्या बाबतीतही तापसीचं काही ठराविक निरीक्षण आहे. ती म्हणते, 'मनमर्जिया मध्ये मी विकीसोबतच्या प्रत्येक सीनमध्ये खूप अलर्ट राहायचे. मला अशी भिती असायची की कुठल्या सीनमध्ये मी विकीच्या समोर कमजोर ठरू नये. विकी खूपच उत्कृष्ट अभिनय करतो.' तापसी ही भूमी पेडणेकर या अभिनेत्रीसोबत 'सांड की आँख' या सिनेमात दिसली होती. आता तिचे 'रश्मी रॉकेट' आणि 'थप्पड' हे सिनेमे येणार आहेत.