काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवर आमदारांची प्रचंड नाराजी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 23, 2019

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवर आमदारांची प्रचंड नाराजी

https://ift.tt/2XEWZIL
मुंबईः राज्यात पुन्हा एकदा यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपचे सरकार आल्यानंतर काँग्रेस आमदारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. राज्याच्या या परिस्थितीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जबाबदार असल्याचा आरोप आता काँग्रेसचे आमदार करीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यात भाजप वगळून शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्याची संधी आघाडीला होती. परंतु, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सत्तास्थापनेसाठी खूप उशीर केला. चर्चेच्या नावाखाली वेळकाढूपणा केल्याने त्याचा थेट फायदा भाजपला झाल्याची भावना या काँग्रेसच्या आमदारांमध्ये आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून कधी दिल्लीत तर कधी मुंबईत बैठका घेणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनी सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठींब्याचे पत्र देण्यास उशीर केला. त्यामुळे शिवसेनेला संख्याबळ अभावी राज्यात सत्ता स्थापन करता आली नाही. राज्यात सत्ता स्थापनेचा पेच कायम असताना तसेच शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांचं सरकार स्थापन होणार असताना आज राज्यात भल्या पहाटे राजकीय भूकंप झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली. फडणवीस यांच्यासोबतच आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनात राज्यपालांनी फडणवीस व अजित पवार यांना मंत्रिपदाची शपथ दिली आहे. भाजपने अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन दिले होते. परंतु, ते आता पाळत नाहीत, अशी टीका करीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजप खाटारडे असल्याची टीका केली. तर भाजपचे नेते व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी असे आश्वासन भाजपने शिवसेनेला कधीच दिले नव्हते, असे स्पष्टीकरण दिल्याने भाजप-शिवसेना यांची गेल्या ३० वर्षापासून सुरू असलेली युती अखेर तुटली. शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार असे वारंवार सांगणाऱ्या व मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसलेल्या शिवसेनेसाठी आजचा दिवस हा राजकीयदृष्ट्या फार घातक ठरला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना हाताशी धरून राज्यात सरकार स्थापन केले आहे.