...जेव्हा एक पॉर्नस्टार होतो क्रिकेटचा पंच - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 9, 2019

...जेव्हा एक पॉर्नस्टार होतो क्रिकेटचा पंच

https://ift.tt/36MmmN8
ऑकलँड मनोरंजन क्षेत्रात आपण सनी लिओनीचा पॉर्न स्टार ते बॉलीवूड अभिनेत्री असा प्रवास पाहिला आहे. पण आता क्रिकेट क्षेत्रातही एक नाव सध्या गाजतंय. इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये ५ नोव्हेंबरमध्ये खेळविण्यात आलेल्या टी-२० सामन्यात गार्थ स्टीराट हे सामन्याच्या पंचांच्या चमूत होते. त्यांनी या सामन्यात चौथ्या पंचाची भूमिका पार पाडली. गार्थ स्टीराट यांनी पॉर्न विश्वाला रामराम करत क्रिकेट पंचाच्या क्षेत्रात करिअरला सुरुवात केली आहे. एका ब्रिटीश वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार ५१ वर्षीय स्टीराट यांनी पॉर्न विश्वात स्टीव पारनेल या नावाने काम केलं आहे. स्टीराट यांच्याबद्दल न्यूझीलंडच्या खेळाडूंनाही पूर्वकल्पना होती आणि त्यांनी याबाबत इंग्लंडच्या खेळाडूंनाही माहिती दिली. स्टीराट याआधी न्यूझीलंडच्या गोल्फर्स संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील होते. १० वर्षांपूर्वी जेव्हा स्टीराट हे पार्न विश्वात काम करत असल्याचे निष्पन्न झालं होतं तेव्हा त्यांना पदावरून दूर करण्यात आलं होतं. त्यानंतर स्टीराट यांनी क्रिकेटकडे लक्ष केंद्रीत केलं आणि पंच होण्याच्या दृष्टीने यशस्वी प्रयत्न केले. याआधी स्टीराट यांनी महिला क्रिकेट विश्वात अनेक सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिलं आहे. न्यूझीलंडने या सामन्यात इंग्लंडवर १४ धावांनी मात केली होती. किवींनी प्रथम फलंदाजी करत ७ विकेटच्या मोबदल्यात १८० धावांचा डोंगर उभारला होता. कॉलिन डी ग्रँडहोमने ३५ चेंडूत ५ चौकार आणि ३ उत्तुंग षटकांच्या जोरावर न्यूझीलंडकडून सर्वाधिक ५५ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या संघाला ७ विकेट्सच्या मोबदल्यात १६६ धावांपर्यंतच मजल मारता आली. इंग्लंडकडून धडाकेबाज मलान याने ३४ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५५ धावा कुटल्या, तर जेम्स विंसने ३९ चेंडूत ४९ धावांची खेळी साकारली. मात्र, या दोघांनाही संघाला विजय प्राप्त करून देता आला नाही.