पवार अजित पवारांना पक्षातून का काढत नाहीत? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 25, 2019

पवार अजित पवारांना पक्षातून का काढत नाहीत?

https://ift.tt/2qHhubS
मुंबई: राजकारणातील चाणक्य समजले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्याविरोधात बंड करणारे त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहेत. त्यांच्या बंडाचा आजचा तिसरा दिवस असून पक्षाकडून त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आज (सोमवार) त्यांचे मन वळवण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही अजित पवार यांची भेट घेतली. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांची हकालपट्टी न करणे ही शरद पवार यांची रणनीती असून या द्वारे ते 'डबल गेम' खेळत असल्याचे सू्त्रांचे म्हणणे आहे. सापही मरावा आणि लाठीही तुटू नये असा शरद पवार यांचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. राज्यातील घडामोडींना मोठा वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना-काँग्रेस आणि भाजप-अजित पवार यांच्याकडून एकमेकांना शह-काटशह देण्याचा खेळ सुरू आहे. अजित पवार यांच्या मदतीने भारतीय जनता पक्ष सरकार स्थापन केल्यानंतर बहुमत मिळवण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे, विरोधक आपल्या गोटातील आमदार फुटू नयेत यासाठी मोठे प्रयत्न सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्याकडे ५२ आमदार परतले असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे. अजित पवारही गुडघे टेकण्यास तयार नाहीत अशात अजित पवार हे देखील मागे हटायला तयार दिसत नाहीत. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असून शरद पवार हेच आमचे नेते आहेत, असे अजित पवार यांनी ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरकार पुढील ५ वर्षांसाठी स्थिर सरकार देईल. राज्य आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी आमचे सरकार गांभिर्याने काम करेल असे अजित पवार यांनी म्हटले आहे. या ट्विटनतर शरद पवार यांनी अजित पवार यांचे म्हणणे खोडून काढले आहे. शरद पवार उत्तर देताना म्हणाले, 'भाजपसोबत आघाडी करण्याचा कोणताही संबंध नाही. राष्ट्रवादीने शिवसेना आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांचं वक्तव्य चुकीचं असून ते लोकांमध्ये गैरसमज आणि संभ्रम निर्माण करणारं आहे’. शरद पवारांच्या दोन कारणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टाकलेल्या या डावामागे दोन कारणे असल्याचे राजकीय विश्लेषक मानत आहेत. अजित पवार यांनी कुटुंबात परतून कुटुंबाची एकता कायम टिकावी असे पवार यांना वाटते. जर पवार हे अजित पवार यांना परत आणण्यात यशस्वी झाले तर भारतीय जनता पक्षाचा दावा संपुष्टात येईल असे विश्लेषकांना वाटते. दुसरे कारण म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जरी अजित पवार यांना पक्षातून काढून टाकले, तरी देखील ते आमदार म्हणून राहतीलच. या मुळे पक्षाला एका आमदाराचे नुकसान होईल. याच कारणामुळे अजित पवार यांनी पक्ष सोडावा असे शरद पवार यांना वाटते. असे झाल्यास अजित पवार यांना पक्षातून काढता येणार आहे. असे झाले तर अजित पवार यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द होईल. शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती विधानसभा मतदार संघातून अजित पवार निवडून आले आहेत.