'मोदी सरकार हाय-हाय'; सत्तासंघर्ष लोकसभेत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 25, 2019

'मोदी सरकार हाय-हाय'; सत्तासंघर्ष लोकसभेत

https://ift.tt/2KRnfL0
नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे पडसाद आज लोकसभेतही उमटले. लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. 'मोदी सरकार हाय-हाय' आणि 'लोकशाहीची हत्या करणं बंद करा', अशी घोषणाबाजी काही खासदारांनी केली. यावेळी काँग्रेसचे खासदार यांनीही सरकारवर हल्लाबोल केला. देशात लोकशाहीची हत्या झाली आहे, असं ते म्हणाले. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचं सरकार राज्यात येणार असं वाटत असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी केल्यानं राज्याच्या राजकारणला वेगळीच कलाटणी मिळाली. या घटनेनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला. अजित पवारांनी दिलेल्या धक्क्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा पक्षाला सावरण्यासाठी सरसावले असून काही आमदार राष्ट्रवादीकडे परतले आहेत. तर, भाजप बहुमताचा आकडा जुळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या प्रकरणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष एकीकडे कोर्टात पोहोचला असतानाच, दुसरीकडे त्याचे पडसाद लोकसभेतही उमटताना पाहायला मिळाले. लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांच्या खासदारांनी सभागृहात घोषणाबाजी देण्यास सुरूवात केली. 'मोदी सरकार हाय-हाय' आणि 'लोकशाहीची हत्या करणं बंद करा', अशी घोषणाबाजी काही खासदारांनी केली. यावेळी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना प्रश्न विचारण्यास सांगितलं. त्यावर देशात लोकशाहीची हत्या झाली आहे. या सभागृहात प्रश्न विचारण्याला तसा अर्थ नाही,' असं ते म्हणाले.

यावेळी अध्यक्षांनी अनेकदा खासदारांना शांत राहण्याची विनंती केली. मात्र, त्याचा काहीही फायदा झाला नाही. अखेर लोकसभा अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज तहकूब केलं. दरम्यान, सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी काही खासदारांनी संसद भवनाच्या प्रांगणात निदर्शने केली. त्यानंतर काही खासदारांनी घोषणाबाजीही केली. यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या देखील निदर्शने करणाऱ्या खासदारांच्या सोबत उपस्थित होत्या.