'लाख प्रयत्न करा, शिवसेनेला कुणीही रोखू शकणार नाही' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 15, 2019

'लाख प्रयत्न करा, शिवसेनेला कुणीही रोखू शकणार नाही'

https://ift.tt/2qXPqR6
मुंबई: 'नव्या सरकारच्या फॉर्म्युल्याची चिंता करू नका. त्यासाठी उद्धव ठाकरे सक्षम आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार येणार आहे. लाख प्रयत्न करा, कुणीही शिवसेनेला रोखू शकणार नाही,' असा विश्वास शिवसेना नेते खासदार यांनी आज बोलून दाखवला.

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपला वगळून राज्यात सत्तास्थापनेच्या सुरू असलेल्या हालचालींवर त्यांनी भाष्य केलं. 'काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. लवकरच त्याला अंतिम रूप दिलं जाणार आहे. नवं सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालणार आहे. राज्याच्या हित या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी असेल,' असं राऊत म्हणाले. नव्या सरकारमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री पाच वर्षे असेल का असं विचारलं असता राऊत म्हणाले, 'फक्त पाच वर्षांचा विचार का करता? शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात २५ वर्षे राहावा अशी आमची इच्छा आहे. शिवसेनेचा महाराष्ट्राच्या सत्तेत कायम राहणार. आम्ही येत-जात राहणार नाही. पुन्हा पुन्हा येईन, असं म्हणणार नाही.' वेगळ्या विचारधारेच्या पक्षांच्या सरकारबदद्ल बोलताना राऊत यांनी वाजपेयी व 'पुलोद'च्या प्रयोगाचे दाखले दिले. 'अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सुद्धा वेगळ्या विचारधारांचे लोक एकत्र आले होते आणि त्यांनी देश चालवला होता. इतकंच काय, एकेकाळी शरद पवारांनी महाराष्ट्रात पुरोगामी लोकशाही दलाचा प्रयोग केला होता. त्या सरकारमध्ये जनसंघ सहभागी होता. अशी सरकारं देशात अनेकदा बनली आहेत. त्यामुळं तशी कुठलीही अडचण होणार नाही,' असं राऊत म्हणाले. असे आहे पक्षीय बलाबल नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक १०५ जागा जिंकता आल्या आहेत. तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीने या निवडणुकीत ५४ आणि काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या आहेत. बहुजन विकास आघाडीला ३, एमआयएमला, समाजवादी पार्टीला आणि प्रहार जनशक्ती पार्टीला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत. त्याशिवाय माकप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पार्टी, शेकाप, मनसे, रासपला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविता आला आहे. या निवडणुकीत एकूण १३ अपक्षही निवडून आले आहेत.