मुंबई: उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे बंडखोर नेते यांनी ट्विटरद्वारे पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान यांचं आभार मानलं आहे. आम्ही महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ, मोदीजी तुमचे खूप खूप आभार, असं ट्विट अजित पवार यांनी केलं आहे. भाजपने मोदींसह भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचेही आभार मानले आहेत. त्यामुळे पवार हे राष्ट्रवादीत परतणार नसल्याचं स्पष्ट झालं असल्याचं सूत्रांनी सांगितलं.