शिवसेनेला आमदार फुटण्याची भीती, अज्ञात स्थळी ठेवणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 7, 2019

शिवसेनेला आमदार फुटण्याची भीती, अज्ञात स्थळी ठेवणार

https://ift.tt/36IhPLG
मुंबई राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. मुंबईत आज भाजपकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे. तर शिवसेनेची 'मातोश्री'वर सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीनंतर सर्व आमदारांना अज्ञात स्थळी नेलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. सत्ता स्थापनेसाठी भाजपकडून आमदार फोडले जाण्याची भीती असल्याने शिवसेनेने खबरदारीचा उपाय योजला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांना मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलात ठेवण्यात येणार आहे. जेणेकरून भाजपकडून फोडाफोडीचा प्रयत्न झाल्यास त्यांना शिवसेनेच्या आमदारांशी संपर्क साधता येणार नाही. वाचा: भाजपच्यावतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार राज्यपालांची भेट घेणार आहेत. त्यानंतर भाजपच्यावतीने पत्रकार परिषदेचेही आयोजन करण्यात आले आहे. सर्वाधिक आमदारांच्या मुद्द्यावर भाजप राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याचं बोललं जात आहे. शुक्रवारी ८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजता सध्याची विधानसभा विजर्सित होईल. त्याअगोदर सत्ता स्थापनेचा दावा करून मंत्रिपदाची शपथ घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आज दिवसभरात अनेक घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेनेला पाठिंबा देण्याविषयी अनुकूल असलेला काँग्रेस नेत्यांचा एक गट आज दिल्लीत पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांच्या दिल्लीवारीवरही सर्वांचं लक्ष असणार आहे. वाचा: