संजय राऊत यांचं नवं ट्विट, पाहा काय म्हणाले! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 24, 2019

संजय राऊत यांचं नवं ट्विट, पाहा काय म्हणाले!

https://ift.tt/2XHAjHT
मुंबईः शिवसेनेचे खासदार यांनी आज सकाळी एक नवीन ट्विट केले आहे. भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीवर भाष्य करणारं त्यांचं ट्विट असून हा शपथविधी म्हणजे अॅक्सिडेंटल आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर टीका केली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांनी आज ट्विट करून भाजपवर निशाना साधला आहे. शनिवारी सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना घडली. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचा दावा करण्याआधीच सकाळी भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करीत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या राजकीय घडामोडीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. अजित पवारांनी बंड केल्याने भाजपला सत्ता स्थापन करण्यात यश मिळाले आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे किती आमदार सोबत आहेत. हे ३० नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार असले तरी शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदावरच्या दाव्यावर सध्या तरी पाणी पडले आहे. राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षाचं सरकार अस्तित्वात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असताना शनिवारी सकाळी भाजपने राजकीय सर्जिकल स्ट्राइक लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनात राज्यपालांनी या दोन्ही नेत्यांना मंत्रिपदाची शपथ दिली. अजित पवार यांना राष्ट्रवादीतील २२ आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, त्यांना किती आमदारांचा पाठींबा आहे, हे अद्याप स्पष्ट नाही. शरद पवार यांनी अजित पवारांचा निर्णय वैयक्तिक असल्याचे स्पष्ट केल्याने राज्याच्या राजकारणात आणखी नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे.