Live: भाजपकडून कुठलीही ऑफर नाही-राऊत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 22, 2019

Live: भाजपकडून कुठलीही ऑफर नाही-राऊत

https://ift.tt/2XBoHGo
मुंबई: भाजपला दूर ठेवून महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याचा निर्णय शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादीनं घेतला असून आजच तिन्ही पक्षाकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाण्याची शक्यता आहे. हे सगळं सुरू असतानाच भाजपनं आता शिवसेनेला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची ऑफर देल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळं आज महाराष्ट्रात हालचालींना वेग येणार आहे. लाइव्ह अपडेट्स: >> विधिमंडळ पक्षाचा नेता ठरविण्यासाठी काँग्रेस आमदारांची आज मुंबईत बैठक >> शिवसेना आमदारांची आज सकाळी दहा वाजता मातोश्रीवर बैठक >> भाजपनं शिवसेनला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्याचं वृत्त; शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं या वृत्ताचं खंडन >> शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्रिपद आणि काँग्रेस, राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद मिळणार - सूत्रांची माहिती >> आघाडी आज सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता