
नवी दिल्लीः नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात तीव्र निदर्शने सुरू आहेत. दिल्लीतील इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थी या कायद्याविरोधात निदर्शने करत असताना पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये झडप होऊन हिंसाचार घडला. दावा या प्रकरणी जीन्स-टीशर्ट अशा पेहरावात असलेल्या एका तरुणाचे छायाचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. भरत शर्मा नामक तरुण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सदस्य तो पोलिसांचे सुरक्षा जॅकेट घालून विद्यापीठात फिरत असल्याचा दावा करण्यात आला. विशेष म्हणजे ट्विटरवरील युजर्स उपरोक्त दावा करण्यात अग्रणी आहेत. विद्यापीठातील एका विद्यार्थीनीला मारहाण करत असतानाचे एक छायाचित्र शेअर करण्यात आले असून, या छायाचित्रात हाच तरुण असल्याचा दावा मोठ्या प्रमाणावर केला गेला. खाली देण्यात आलेल्या छायाचित्रासह सोशल मीडियावर हा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, हा तरुण जर पोलीस कर्मचारी आहे, तर तो गणवेषात का नाही, असा प्रश्न ट्विटर युजर्सनी विचारला आहे. याशिवाय आणखी एका माणसाचा फोटो शेअर करण्यात आला आहे. हा इसम साध्या वेषात असून, त्यानेही पोलिसांचे सुरक्षा जॅकेट घातल्याचे दिसत आहे. ही व्यक्ती दलातील कर्मचारी नाही, असा दावा करण्यात येत आहे. सत्य काय आहे? साध्या वेषातील पोलिसांचे सुरक्षा जॅकेट घातलेली व्यक्ती दिल्ली पोलिसामध्ये कॉन्स्टेबल आहे. या व्यक्तीचे नाव अरविंद आहे आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास पथकातील एक सदस्य आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'चे पत्रकार सोमरीत भट्टाचार्य यांनी दिल्ली पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याप्रकरणी संवाद साधला. साध्य गणवेषातील व्यक्ती 'एबीव्हीपी'चा कार्यकर्ता असल्याचा दावा पोलिसांनी खोडून काढला आहे. छायाचित्रात अरविंद यांनी पोलिसांचे हेल्मेट घातले असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास पथकाचे कार्य लक्षात घेता त्यांना साध्या वेशात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांना लाठीमार करत असलेल्या पोलिसांच्या व्हायरल व्हिडिओमध्ये अरविंद असल्याचे दिसत आहे. भरत शर्मा आपल्या फेसबुक बायोनुसार, चे सदस्य आहेत. विद्यार्थ्यांवर लाठीमार करत असलेल्या पोलिसांच्या व्हायरल व्हिडिओमधील व्यक्ती दिल्ली पोलीस विभागातील अन्य कर्मचारी आहेत. 'टाइम्स फॅक्ट चेक'शी संवाद साधताना पोलीस अधिकारी चिन्मय बिस्वाल यांनी या गोष्टीला अधिकृत दुजोरा दिला. तीन वेगळी तुलनात्मक छायाचित्रे निष्कर्षः ABVP / सदस्यांनी दिल्ली पोलिसांच्या पथकात घुसून विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याचा दावा खोटा आहे, असे 'टाइम्स फॅक्ट चेक'च्या छाननीत निश्चित झाले आहे.