..अन् पत्ता विसरलेली आजी सुखरूप परतली घरी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 29, 2019

..अन् पत्ता विसरलेली आजी सुखरूप परतली घरी

https://ift.tt/2F1eM4H
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक भुसावळ येथून आले. पण पत्ताच सांगता येईना. वय देखील झालेले. एक मुलगा रेल्वेत कामाला आहे, एवढीच आजीची माहिती. मात्र, या एवढ्या माहितीवरून निर्भया पथकाने आजीचा नाशिकमधील पत्ता शोधला. एवढेच नव्हे तर वृद्ध महिलेला तिच्या कुटुंबीयांपर्यंत सुखरूप पोहचवले. नाशिकरोडच्या मालधक्का येथे ही वृद्ध महिला असल्याची माहिती निर्भया पथकास शुक्रवारी (दि.२७) मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठले. ‘भुसावळवरून आले. एक मुलगा मध्य रेल्वेत कामाला आहे’ एवढीच माहिती आजीबाई सांगत होत्या. निर्भया पथक क्रमांक चारच्या पोलिस उपनिरीक्षक वैशाली मुकणे, गंधास आणि कर्मचाऱ्यांनी शोध मोहीम हाती घेतली. या पथकाने रेल्वे स्थानक प्रशासनाकडे विचारपूस केली. तेथे त्यांना हा मुलगा भुसावळ येथे राहत असल्याचे समजले आणि संपर्क क्रमांकही मिळाला. त्यानुसार पोलिसांनी चौकशी केली. त्यात आजीचा एक मुलगा सातपूर परिसरातील श्रमिकनगर येथे राहत असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने राजू सपकाळे आणि त्यांची सून यांना शोधले आणि वृद्ध आजीस त्यांच्याकडे सोपवले.