अध्यक्ष महोदयांनी 'डावीकडे' लक्ष द्यावे: फडणवीस - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 1, 2019

अध्यक्ष महोदयांनी 'डावीकडे' लक्ष द्यावे: फडणवीस

https://ift.tt/2OTYfUo
मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर सभागृहात त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. भाजपचे विधीमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवसी यांनी पटोले यांचे अभिनंदन केले. 'विरोधी पक्षाला अध्यक्षाचाच आधार असतो,' असे सांगत फडणवीस यांनी 'अध्यक्ष महोदयांनी विरोधक बसतात त्या डाव्या बाजुने जास्त ऐकावे आणि उजव्या बाजुने कमी ऐकावे,' अशी विनंती पटोले यांना केली. फडणवीस म्हणाले, 'किसन कथोरे यांचा अर्ज आम्ही मागे घेतला. अध्यक्षांची एकमताने निवड होतेय याचा आम्हाला आनंद आहे. आपला आणि माझा संबंध जुना आहे. आपण विरोधी पक्षात होतात तेव्हाही आपले चांगले संबंध होते. आपल्याला दोन्ही बाजुंच्या नेत्यांच्या मर्यादा, त्यांच्या क्षमता, आशा आकांक्षा माहित आहेत. अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडताना याचा आपल्याला निश्चितच फायदा होईल.'

विरोधी पक्षाचा आधार 'अध्यक्षांची उच्च परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. आतापर्यंतच्या सर्व अध्यक्षांनी महाराष्ट्र विधानसभेचा सन्मान वाढवण्याच्या दृष्टीने आपली जबाबदारी सांभाळली आहे. विरोधी पक्षाला अध्यक्षाचाच आधार असतो. अध्यक्षाने डाव्या कानाने जास्त ऐकायचं आणि उजव्या बाजुला कमी ऐकायचं असतं. तुम्ही डाव्या बाजुला पाहाल, तेथेच कान ठेवाल अशी अपेक्षा आहे,' असं फडणवीस म्हणाले. कृषीमंत्रिपद मिळेल असं वाटलं होतं फडणवीस म्हणाले, 'लोकहिताच्या प्रश्नावर ज्या ज्या वेळी आम्ही विषय मांडण्याचा प्रयत्न करू त्यावेळी तुमचे सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमची भूमिका मांडायला, आम्हाला न्याय द्यायचे काम आपण कराल अशी आम्हाला अपेक्षा आहे. वास्तविक शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असल्याने आपल्याला या मंत्रिमंडळात कृषीमंत्रिपद मिळेल अशी आम्हाला आशा होती.'