टी-२० वर्ल्डकप: 'संघात वेगवान गोलंदाजाची १ जागा' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, December 6, 2019

टी-२० वर्ल्डकप: 'संघात वेगवान गोलंदाजाची १ जागा'

https://ift.tt/33UDxcG
हैदराबाद: पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी -20 विश्वचषक स्पर्धेसाठी टीमच्या वेगवान गोलंदाजांच्या फळीत फक्त एकच जागा भरणे आवश्यक असल्याचे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीस याने म्हटले आहे. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी संघात स्थान मिळवण्याचे जवळजवळ निश्चित असल्याचे कोहलीच्या या वक्तव्यावरून सूचित होत आहे. ही स्पर्धा एका जागेसाठी आहे आणि मला वाटते की तिन्ही खेळाडूंनी त्यांची जागा जवळपास पक्की केली आहे. ही निकोप स्पर्धा आहे. कोणाची निवड होईल हे पाहणे औत्सु्क्याचे ठरणार आहे, असे कोहलीने पत्रकारांशी बोलताना सांगितले. वेगवान गोलंदाजी विभागात असलेल्या अनेक पर्यायांबाबात बोलताना कोहली म्हणाला की, कर्णधार म्हणून माझ्यासाठी ते चांगले आहे. संघात अनेक जलदगती गोलंदाज असणे हा आमच्यापुढे मोठा प्रश्न आहे असे नाही. मला वाटते भुवी (भुवनेश्वर) आणि जसप्रीत बुमराह हे अनुभवी खेळाडू आहेत. टी -20 क्रिकेटमध्ये त्याच्या कामगिरीत बरीच सुसंगतता आहे. दीपक (चाहर) देखील चांगली गोलंदाजी करत आहे.' मोहम्मद शमी पुनरागमन करीत आहे आणि तो चांगली गोलंदाजी करत आहे. त्याला चांगला सूर सापडून त्याने टी २० क्रिकेटसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींवर काम केले तर ऑस्ट्रेलियासारख्या ठिकाणी, विशेषत: नवीन बॉलसह विकेट घेण्याची क्षमता त्याच्याकडे असल्यामुळे तो खूपच उपयुक्त ठरेल. त्याच्याकडे यॉर्कर टाकण्यासाठी पुरेसा वेग आहे. ' टी -२० प्रकारात भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीच्या पुनरागमनानंतर भारतीय वेगवान गोलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे. शमी शेवटचा टी -२० आंतरराष्ट्रीय सामना २०१७ मध्ये खेळला होता. भुवनेश्वर स्नायूंच्या दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करीत होते. भुवनेश्वर यावर्षी ऑगस्टमध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध कॅरेबियनमध्ये शेवटचा टी -२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. बांगलादेशविरुद्धच्या अखेरच्या घरच्या मालिकेत शानदार गोलंदाजी करणाऱ्या चहरनेही संघात येण्याचा दावा बळकट केला आहे. तीन वेगवान गोलंदाजांव्यतिरिक्त काही अन्य खेळाडूदेखील या जागेचे दावेदार आहेत. प्रत्येकजण उत्तम प्रकारे गोलंदाजी करत असल्याने हे दावे योग्य असल्याचेही कोहली म्हणाला.