निर्भयाः मी दोषींना फाशी देते; रक्ताने लिहिले पत्र - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 15, 2019

निर्भयाः मी दोषींना फाशी देते; रक्ताने लिहिले पत्र

https://ift.tt/34g4jfO
लखनऊः प्रकरणातील आरोपींना मला फासावर लटकवायचे आहे, अशी मागणी आंतरराष्ट्रीय नेमबाज यांनी गृहमंत्री यांच्याकडे केली आहे. रक्ताने लिहिलेल्या पत्राद्वारे वर्तिका सिंह यांनी अमित शहा यांना साद घातली आहे. निर्भया प्रकरणातील आरोपी सध्या तिहार कारागृहात असून, या चौघांना एकत्र फाशी देण्याची तयारी केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. निर्भया बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या चारही आरोपींना महिलेकरवी फासावर लटकवण्यात यावे. यासाठी मी तयार आहे. महिलेच्या हातून फाशी दिल्यामुळे संपूर्ण देशात एक वेगळा संदेश जाईल. एक महिला फाशीही देऊ शकते, ही बाब त्यातून अधोरेखित होईल, असे वर्तिका सिंह यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. माझ्या मागणीला महिला कलाकार आणि महिला खासदारांनी पाठिंबा द्यावा. यामुळे समाजात सकारात्मक बदल होतील, अशी मला आशा आहे, असेही वर्तिका सिंह यांनी पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या निर्भया प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फासावर लटकवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यातूनच प्रशासनाकडून फाशीची तयारी करण्यात आली असून, अलीकडेच एका डमीमध्ये १०० किलो वाळू भरून डमीला फाशी देण्यात आली. डमीला एक तास लटकवून ठेवत त्याचा आढावाही घेण्यात आला. तर दुसरीकडे, निर्भया हत्याकांडातील चारही आरोपींना फाशी देण्यासाठी तिहार तुरुंगात एकही जल्लाद नसल्याची माहिती समोर आली आहे. हिमाचल प्रदेशातील शिमला येथे राहणाऱ्या रवी कुमार यांनी या आरोपींना फाशी देण्यासाठी जल्लाद बनण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. रवीने राष्ट्रपतींना पत्र लिहून तिहार तुरुंगात आपली जल्लाद म्हणून तात्पुरती नियुक्ती करावी, अशी विनंती केली आहे. महिन्याभरात या चारही आरोपींच्या फाशीची तारीख निश्चित होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.