
रांची: झारखंड विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील १५ जागांसाठी सुरू झाले आहे. आज (सोमवार) सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाले. सकाळी अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या. लोकांमध्ये उत्साह असल्याचेही दिसून आले. यांनीही ट्वीट करून मतदारांना घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे. ज्या १५ जागांवर मतदान सुरू आहे, त्या जागांवर काही दिग्गजांचे राजकीय भवितव्यही ठरविले जाणार आहे. राज्यातील दोन प्रमुख मंत्र्यांसह एकूण २२१ उमेदवारांचे भवितव्य या मतदानामार्फत ठरणार आहे. मधुपूर मतदारसंघात झारखंड मुक्ती मोर्चाचे उमेदवार हुसेन अन्सारी आणि राज्याचे कामगारमंत्री आणि भाजपचे उमेदवार राज पालीवार यांच्यात मुख्य लढत होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर चंदनकियारी जागेची मुख्य लढत महसूलमंत्री अमर कुमार बावरी आणि अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेचे उमेदवार उमाकांत राजक यांच्यात होण्याची शक्यता आहे. झारिया मतदारसंघात एकाच कुटुंबातील दोन महिलांमधील थेट स्पर्धा पाहायला मिळू शकणार आहे. इथे भाजपच्या रागिनीसिंग या उमेदवार आहेत. त्याचवेळी कॉंग्रेसने पूर्णिमा नीरज सिंग यांना तिकीट दिले आहे. रागिनी या भगवा पक्षाचे विद्यमान आमदार संजीव सिंह यांच्या पत्नी आहेत. त्यांचा चुलतभाऊ नीरज सिंग (कॉंग्रेस नेता) याच्या हत्येप्रकरणी सिंग सध्या तुरूंगात आहेत. एकूण १५ विधानसभेच्या जागांसाठी एकूण, ४७,८५,०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये २२४४१३४ महिला आणि ८१ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. चौथ्या टप्प्यात २३ महिला उमेदवारांसह एकूण २२१ उमेदवार रिंगणात आहेत. बोकारो सीटवर सर्वाधिक २५ उमेदवार निवडणूक लढवित आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आधिकारी विनयकुमार चौबे यांनी दिली. चौबे म्हणाले की, जमुआ, बगोदर, गिरीडीह, डुमरी आणि तुंडी या जागांसाठी सकाळी ७ वाजता मतदान सुरू झालेले मतदान दुपारी तीन वाजेपर्यंत चालेल. तर, उर्वरित जागांवर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. या मतदानासाठी एकूण ६१०१ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील १६ जागांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर, मतमोजणी २३ डिसेंबर रोजी होईल.