
विरार: पूर्व येथील कुंभारपाडा येथील एका मोबाइल शॉपमध्ये रविवारी रात्री एका मोबाईल शॉपमध्ये गोळीबार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या गोळीबारात दोन जण जखमी झाले आहेत. या गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले असून हल्लेखोरांपैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. हा गोळीबार कशामुळे झाला हे मात्र अस्पष्ट आहे. रविरारी रात्री काही जण कुंभारपाड्यातील एका मोबाइल शॉपमध्ये शिरले. त्या वेळी मोबाइल शॉपचा मालक आपले शॉप बंद करण्याच्या तयारीत होता. या हल्लेखोरांनी मालकाला मोबाइल फोनबाबत विचारणा केली. त्यानंतर हल्लेखोर आणि मालकाममध्ये वाद सुरू झाला. त्यानंतर या हल्लेखोरांनी खेट पिस्तूल बाहेर काढून गोळ्या झाडल्या. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. यात दोघे जखमी झाले. त्यांना तातडीने हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अचानक गोळीबाराची घटना घडल्याने विरार परिसरात खळबळ माजली आहे. विरारमध्ये टोळी कार्यरत आहे का? दरम्यान, रात्रीच्या वेळेस एका झाल्याने विरारमध्ये एखादी टोळी कार्यरत आहे का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. गोळीबाराच्या घटनेमुळे विरारमधील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. हा गोळीबार नेमका कशामुळे झाला, गोळीबार करणारे तरुण नेमके कोण होते, त्यांच्याकडे पिस्तूल बाळगण्याचा परवाना आहे का, तसेच ते एखाद्या टोळीशी संबंधित आहेत का, या प्रश्नांचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, या हल्लेखोरांपैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आल्यामुळे या गोळीबाराचा लवकरच उलगडा होईल असे सांगितले जात आहे.