रेप इन इंडिया: राहुल गांधीना आयोगाची नोटीस - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 16, 2019

रेप इन इंडिया: राहुल गांधीना आयोगाची नोटीस

https://ift.tt/2RWVJQK
नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार यांनी केलेल्या '' चा वक्तव्याचे स्पष्टीकरण देण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने राहुल यांना केल्या आहेत. राहुल यांच्या या वक्तव्याविरोधात केंद्रीय मंत्री यांनी त्यांची केंद्रीय नवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. राहुल यांनी संथालपरगणा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बलात्काराच्या वाढत्या घटनांच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले होते. त्या वेळी मोदींवर टीकास्त्र सोडताना मोदींचे 'मेक इन इंडिया' आता भारतात 'रेप इन इंडिया' बनले आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. भारतात दररोज बलात्कारासारखे गुन्हे घडत असल्याचेही राहुल म्हणाले होते. त्यावर संसदेत आणि संसदेबाहेरही राहुल याचा निषेध करण्यात आला. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून भाजप खासदारांनी लोकसभेत जोरदार हंगामा केला होता. भाजपच्या महिला खासदारांनीही राहुल गांधींनी माफी मागावी अशी जोरदार मागणी केली. या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाजही तहकूब करावे लागले होते. त्यावर मात्र आपण माफी मागणार नाही, असे राहुल गांधी यांनी ठामपणे सांगितले होते. माझे नाव राहुल गांधी आहे, राहुल सावरकर नाही असे म्हणत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या जोरदार हल्ल्याला परतवून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकसभेत आक्रमक झालेल्या स्मृती इराणी यांनी राहुल यांच्या वक्तव्याविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली. आता राहुल या नोटीशीला काय उत्तर देतात हे पाहण्यासारखे आहे.