व्हॉट्सअॅवपर डार्कमोड फिचर आले, पाहिले का? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, December 26, 2019

व्हॉट्सअॅवपर डार्कमोड फिचर आले, पाहिले का?

https://ift.tt/39eW2MU
नवी दिल्लीः अतुरतेने वाट पाहात असलेल्या Whatsapp युजर्ससाठी गुड न्यूज आहे. बहुप्रतीक्षित असे डार्कमोड फिचर व्हॉट्सअॅपवर सुरू झाले आहे. काही युजर्सनी या फिचरचा वापरही सुरू केलाय. हे डार्कमोड फिचर सर्व युजर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हॉट्सअॅपची जोरदार तयारी सुरू आहे, अशी माहिती व्हॉट्सअॅप बीटा अपडेट्स ट्रॅक करणाऱ्या या वेबसाइटने दिलीय. हे डार्कमोड फिचर अँड्राइड बीटा व्हर्जनवर काही दिवसांपूर्वीच उपलब्ध करून देण्यात आलंय. डार्कमोडची टेस्टींग सुरू व्हॉट्सअॅपचे डार्कमोड फिचर सध्या काही मोजक्या युजर्सना उपलब्ध करून देण्यात आले आहे. तात्पुरत्या स्वरूपात आणि मर्यादित युजर्सना हे फिचर सध्या उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व युजर्सना हे फिचर उपलब्ध करून देण्यापूर्वी कंपनी त्याची सर्व स्तरावर चाचणी करत आहे. काही त्रुटी आढळून आल्यास त्या दुरुस्त करण्यात येणार आहे. डार्कमोड हे फिचर कायम स्वरुपी कधीपर्यंत उपलब्ध करून दिले जाईल, याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. iOS साठी डेव्हलप होतंय फिचर हे फिचर अँड्रॉइडवर आलंय. पण iOS वरील युजर्सना अजून वाट पाहावी लागले. iOS वरील फिचर डेव्हलप केले जात आहे. iOSवरील डार्कमोड फिचरही हळूहळू अंमलात आणले जाईल. पण सध्या ते डेव्हलप होत आहे आणि तात्पुरते म्हणजे अनस्टेबल स्वरुपात आहे. iOSवरील डार्कमोडमध्ये सुधारणेची गरज आहे, असं WABetaInfo ने ट्विटमध्ये म्हटलंय. काही ऑप्शन्समध्ये दिसतंय डार्कमोड डार्कमोडमध्ये आढळून आलेल्या त्रुटी व्हॉट्सअॅप फक्त १५ मिनिटांत दूर करू शकतं. पण व्हॉट्सअॅप त्याला किती वेळ लागले हे सांगता येत नाही. व्हॉट्सअॅपमध्ये कुठे-कुठे हे डार्कमोड दिसत आहे. कॅमेराने काढलेला फोटो व्हॉट्सअॅपवर शेअर करताना युजरना डार्कमोड फिचर दिसून येतंय, असं WABetaInfoने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलंय. येणार डिलीट मेसेज फिचर डार्कमोडसोबतच व्हॉट्सअॅप युजर्स डिलीट मेसेज फिचरच्याही प्रतीक्षेत आहेत. आपण पाठवलेला मेसेज युजर्सना ऑटोमेटीक डिलीट करता येणार आहेत. युजर्स आपला मेसेज ऑटोमेटीक डिलीट करण्याचा कालावधी ठरवू शकणार आहेत. सुरुवातीला कंपनी अँड्रॉइड युजर्ससाठी हे फिचर आणणार आहे.