हैदराबाद घटनेवर विराट संतापला, म्हणाला... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 1, 2019

हैदराबाद घटनेवर विराट संतापला, म्हणाला...

https://ift.tt/2OD9TEv
नवी दिल्ली: हैदराबादमधील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची जाळून हत्या केल्याच्या घटनेमुळं अवघा देश हादरला आहे. देशभरात विविध ठिकाणी संताप व्यक्त केला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसह क्रिडा जगतातील दिग्गज खेळाडूंनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. हैदराबादमध्ये जे घडलं ते लज्जास्पद आहे, असं विराट म्हणाला. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं ट्विट करून दुःख व्यक्त केलं आहे. 'हैदराबादमध्ये जे घडलं, ते लज्जास्पद आहे. एक समाज म्हणून पुढे येऊन असे अमानवी कृत्यांचा विनाश करण्याची वेळ आली आहे,' असं विराट म्हणाला. त्याआधी दिग्गज क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण आणि भारताचा सलामीवीर शिखर धवन यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. हरभजन सिंग यानंही संताप व्यक्त केला. 'देश कुणाचाही असो, जेव्हा माणुसकी मरते, त्यावेळी अवघा जग रडतो,' असं इरफान पठाण म्हणाला. संतप्त जमावाचा पोलीस ठाण्याला घेराव हैदराबाद शहरापासून ५० किलोमीटर अंतरावर शादनगर पोलीस स्टेशन आहे. या पोलीस ठाण्यात नराधम आरोपींना आणण्यात आल्याचं जमावाला कळलं. त्यासरशी शेकडोंच्या जमावाने आम्हाला न्याय हवाय, अशी घोषणाबाजी करतच पोलीस ठाण्याला घेराव घातला. विद्यार्थी आणि महिला यावेळी मोठ्या प्रमाणावर हजर होत्या. कोणताही तपास न करता, कोणतीही सुनावणी न करता या आरोपींना भरचौकात फाशी देण्याची मागणी करत जमावाने जोरदार निदर्शने केली. या नराधमांना समाजात कोणतेही स्थान नाही. एन्काउंटरमध्ये त्यांचा थेट खात्मा केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केली.