
मुंबई- सलमान खानचे () कट्टर चाहते त्याच्या लग्नाची अनेक वर्षांपासून वाट पाहत आहेत. पण अखेर त्यांची ही प्रतीक्षा संपली असून त्याला आता त्याची वधू मिळाली आहे. सलमानची पत्नी दुसरी कोणी नसून कपिल शर्मा शोमधली गुत्थीच आहे. सलमानने शोदरम्यान गुत्थीला ()हार घातला आणि लग्न केलं. एवढंच नाही तर सलमानच्या लग्नासोबतच त्यांचं हनिमूनही टीव्हीवर दाखवण्यात आलं. 'बिग बॉस'च्या १४ डिसेंबरच्या भागात सलमानचं लग्न झालेलं दाखवण्यात आलं. शोमध्ये सुनील ग्रोवर त्याच्या प्रसिद्ध गुत्थी व्यक्तिरेखेत आला होता. शोदरम्यान गुत्थीने सलमानसोबत रोमान्स करत त्याच्यावर फुलांचा वर्षाव केला. यानंतर तिने सलमानसोबत 'दिल दियां गल्लां' गाण्यावर डान्स केला. यानंतर गुत्थी सलमानला बोलली की, 'मी तुमच्या बाबांना भेटले होते. मी त्यांना बोलले की, मला तुमच्या मुलाशी लग्न करायचं आहे. तेही म्हणाले की, जर त्याने तुझ्या कपाळात कुंकू भरलं तर लगेच भरून घे.' यानंतर सलमानने गुत्थीच्या कपाळात कुंकू भरलं. एवढंच नाही तर शोमध्ये सलमानचं बाळही दिसलं. सलमानने गुत्थी आणि बाळासोबत एक सेल्फीही काढला. या संपूर्ण अॅक्टवेळी सलमान पोट धरून हसत होता. फक्त सलमानचं नाही गुत्थीच्या रोमॅण्टिक डान्सवर प्रेक्षकही जोरजोरात हसत होते. सुनील ग्रोवरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्याने 'कानपुरवाले खुरानाज'मध्ये शेवटचं काम केलं. याआधी त्याने जियो 'धन धन धना धन' शो केला होता. सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर २०१९ मध्ये आलेल्या 'भारत' सिनेमात तो सलमानसोबतच दिसला होता. यात त्याने सलमानच्या जवळच्या मित्राची व्यक्तिरेखा साकारली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी कपिल शर्माला मुलगी झाल्याचे कळताच सुनील ग्रोवरनेही त्याला शुभेच्छा दिल्या. सुनीलने ट्वीट करत लिहिलं की, ‘अभिनंदन, प्रेम आणि आशीर्वाद’ सुनीलचं हे ट्वीट अनेकांसाठी धक्कादायक होतं. कारण द कपिल शर्मा शोच्या पहिल्या सिझनमध्ये कपिल आणि सुनीलमध्ये वाद झाला होता. हा वाद एवढा विकोपाला गेला की सुनीलने शो सोडण्याचा निर्णय घेतला होता.