
दिल्ली: भारतीय महिलांसाठी २०१९ वर्ष शानदार असे ठरले. या वर्षी महिलांनी क्रीडा क्षेत्रात स्वत:चा दबदबा निर्माण केला. भारतीय महिलांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ची छाप उमटवली. याच वर्षी पी.व्ही.सिंधू (PV Sindhu)ने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती. सिंधूच नव्हे तर अशा अनेक महिला आहेत ज्यांनी प्रचंड मेहनत आणि कष्ट करून यश मिळवले आहे. सोशल मीडियावर सध्या अशाच एका मुलीच्या यशाची गोष्ट व्हायरल होत आहे. ११ वर्षाच्या या मुलीने मिळवलेल्या यशाचे सर्व जण कौतुक करत आहेत. रिया बुलोस () या ११ वर्षाच्या धावपटूने सध्या जगभरातील क्रीडा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. फिलिपिन्स ()मधील या मुलीने आंतरशालेय धावण्याच्या स्पर्धेत एक खास पद्धतीचा बूट घातला होता. रियाकडे शालेय स्पर्धेत धावण्यासाठी बूट नव्हते. यावर मार्ग रियाने स्वत:च शोधला आणि एक बूट तयार केला. रियाने धावण्यासाठी बँडेजच्या मदतीने बूट तयार केले. रियाने टाचा आणि तळवे विशिष्ट पद्धतीने बँडेजने बांधले आणि त्यावर स्वत: तयार केलेला एक लोगो देखील काढला. रियाच्या या खास बूटाची चर्चा आता सोशल मीडियावर होत आहे. रियाची गोष्ट फक्त बँडेजपासून बूट तयार करण्यापर्यंत मर्यादीत नाही. या अनोख्या बूटासह रियाने ४०० मीटर, ८०० मीटर आणि १ हजार ५०० मीटर स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. रियाच्या या यशाचे कौतुक जगभरातील नेटिझन्स करत आहेत. इच्छा असेल कोणत्याही परिस्थितीत मार्ग निघतो असाच संदेश रियाने सर्वांना दिला आहे. रियाचे प्रशिक्षक प्रेडिरिक बी.व्हेलेनझुएला (Predirick B. Valenzuela) यांनी रियाचा फोटो फेसबुकवर शेअर केला. त्यावर तिघांनी जगप्रसिद्ध नायकी () कंपनीला रियाला मदत करण्याचे आवाहन केले. त्यानंतर एका बास्केटबॉल स्टोअरचे मालक जॅफ कारिआसो यांनी ट्विटवरून रियाचा नंबर मागितला आणि तिला बूट भेट दिली.