भावासाठी कायपण! एअरपोर्टवरच तयार झाली करिना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 15, 2019

भावासाठी कायपण! एअरपोर्टवरच तयार झाली करिना

https://ift.tt/2Ek2WC9
बंगळुरू- सध्या बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर तिचा आगामी सिनेमा 'गुड न्यूज'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. प्रमोशनमधून वेळ काढत ती स्वतःचा वेळ मुलगा तैमुर आणि कुटुंबालाही देते. नुकतीच ती बंगळुरू येथे एका स्टोअरच्या उद्घाटनाला गेली होती. या दरम्यानचा तिचा विमानतळावरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ती चक्क विमानतळावर बसूनच मेकअप करताना दिसत आहे. चुलत भाऊ अरमान जैनच्या रोका सेरेमनीला जाण्यासाठी वेळ वाचावा म्हणून तिने चक्क विमानतळावर बसून मेकअप करायला सुरुवात केली. व्हिडिओमध्ये मेकअप आर्टिस्ट आणि हेअर स्टायलिस्ट करिनाला तयार करताना दिसत आहेत. तर करिना लाल रंगाच्या चुडीदार ड्रेसमध्ये हातात आरसा घेऊन स्वतःला पाहताना दिसत आहे. भावाच्या लग्नाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो. अरमान जैन हा करिनाचा चुलत भाऊ आहे. अरमान गर्लफ्रेंड अनिशा मल्होत्राशी लग्न करत आहे. त्याने २०१४ मध्ये 'लेकर हम दीवाना दिल' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नव्हता. करिनाच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर लवकरच तिचा अक्षय कुमारसोबतचा 'गुड न्यूज' सिनेमा प्रदर्शित होत आहे. याशिवाय ती पुढच्यावर्षी इरफान खानसोबत 'अंग्रेजी मीडियम' आणि करण जोहरच्या मल्टी-स्टारर 'तख्त' सिनेमात दिसणार आहे.