
मुंबई : पेट्रोल दराने मिळाला आहे. सोमवारी मुंबईत पेट्रोलचा दर ८०.३५ रूपये असून त्यात ५ पैशांची घसरण झाली. डिझेल दरात मात्र सलग सातव्या दिवशी कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत प्रति लिटर ६९.२७ रुपये आहे. इंडियन ऑईलच्या दर पत्रकानुसार दिल्लीत पेट्रोल दर ७४.६९ रुपये असून डिझेलसाठी ६६.०४ रुपये मोजावे लागत आहे. दिल्लीत स्थानिक कर कमी असल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर ८०.३५ रूपये असून डिझेल ६९.२७ रुपये प्रति लिटरआहे. कोलकात्यात पेट्रोल प्रति लिटर ७७.३५ असून डिझेल ६८.४५ रुपयांवर स्थिर आहे. देशभरात वेगवेगळे असल्याने पेट्रोल आणि डिझेलचा दर राज्यनिहाय वेगळा आहे. जागतिक कमोडिटी बाजारातील खनिज तेलाच्या किंमतीनुसार तेल वितरक कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा दररोज आढावा घेतात. रविवारी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात १० ते ११ पैशांची कपात केली. सोमवारी त्यात आणखी ५ पैशांची कपात केली. नोएडात पेट्रोलचा दर ७६.०५ रूपये असून डिझेल ६६.३५ रुपये प्रति लिटरआहे. पेट्रोल मुंबई ८०.३५ दिल्ली ७४.६९ कोलकाता ७७.३५ नोएडा ७६.०५ डिझेल मुंबई ६९.२७ दिल्ली ६६.०४ कोलकाता ६८.४५ नोएडा ६६.३५