चिअर्स! थर्टी फर्स्टला पहाटेपर्यंत बार खुले राहणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 22, 2019

चिअर्स! थर्टी फर्स्टला पहाटेपर्यंत बार खुले राहणार

https://ift.tt/3737dX9
मुंबईः नाताळ आणि थर्टी फर्स्ट साजरं करणाऱ्यासांठी चिअर्स.... मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात २४, २५ आणि ३१ डिसेंबरला पहाटे ५ वाजेपर्यंत बार सुरू राहणार आहेत. तर वाइन शॉप रात्री १ वाजेपर्यंत खुले राहतील. पार्टी करणाऱ्यांनी स्वस्त मद्य घेताना सावध राहावं. आरोग्याला हानी करणारे अवैध आणि निकृष्ट दर्जाचे मद्य सेवन करू नये. पवानाधारक दुकानातूनच मद्य विकत घ्यावे, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. लोकसभा निवडणुकीपासून ते आतापर्यंत उत्पादन शुल्क विभागाने अनेक ठिकाणे छापे टाकून कारवाई केली. या कारवाईत ३ कोटी रुपयांहून अधिकचे बनावट मद्य जप्त करण्यात आले आहे. तसंच या प्रकरणी अनेकांना अटक करत कारखाने आणि गोदामंही सील करण्यात आली आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये ब्रँडेड मद्याच्या नावाने बनावट मद्य विकले जात असल्याचं प्रशासनाच्या नजरेस आलंय. हे बनावट मद्य आरोग्याला हानीकारक आणि मोठे आर्थिक नुकसान करणारे आहे, असं उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता वर्मा यांनी सांगितलं. दारूची दुकानं रात्री ११.३० पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर रात्री १.३० पर्यंत परमिट रूम सुरू ठेवता येणार आहेत. नाताळ आणि नवीन वर्ष साजरं करण्यासाठी ही सवलत देण्यात आली आहे. मुंबईत साकीनाकामध्ये उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत १३ लाख रुपयांचा बनावट मद्याचा साठा जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी राहुल परमार (वय २४) याला अटक केलीय. याशिवाय अनेक ब्रँडच्या रिकाम्या बाटल्या आणि स्टीकर आणि स्टेशरनही जप्त केलीय. पार्टी करणाऱ्यांना सूचना नाताळ आणि नव वर्ष साजरं करताना मद्य सेवन हे परमिट रूम किंवा घरी करावं. कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी करू नये. मुलांसमोर मद्य सेवन करू नका. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ५ हजारांचा दंड किंवा सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि अवैध ठिकाणी मद्य सेवन करताना आढळल्यास दोन्ही शिक्षा होऊ शकतात.