उन्नाव: बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 22, 2019

उन्नाव: बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू

https://ift.tt/2rnbOnS
कानपूर: उन्नावच्या पोलीस अधीकक्षांच्या कार्यालयाबाहेर स्वत:ला जाळून घेणाऱ्या अत्याचार पीडितेचा कानपूरच्या हॉस्पिटलमध्ये शनिवारी रात्री मृत्यू झाला आहे. आपल्यावर अत्याचार करणारा आरोपी अनधेश सिंग यांच्याविरोधात दिलेल्या तक्रारीवर पोलीस कारवाई करत नसल्याचा या युवतीचा (२३) आरोप होता. या आरोपीने आपल्याशी लग्न करणार असल्याचे वचन दिले होते, मात्र, नंतर त्याने संबंध नाकारले होते, असे युवतीचे म्हणणे होते. या प्रकारानंतर आरोपी अवधेश सिंग याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर कोर्टात त्याला अंतरिम जामीन मिळाला होता. पोलिसांनी आरोपीविरुद्ध आरोपपत्रही दाखल केले होते. शनिवारी सकाळपासून पीडिता होती व्हेंटिलेटरवर आत्मदहनानंतर ही युवती ८० टक्के भाजली होती. तिला १६ डिसेंबर या दिवशी कानपूरमधील लाला लजपतराय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आत्मदहनानंतर या युवतीची श्वास नलिका आणि पोटाला सूज आली होती. शनिवारी सकाळपासून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. १६ डिसेंबरला पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर अंगावर रॉकेल ओतून या युवतीने स्वत:ला जाळून घेतले होते. त्यानंतर आगीच्या ज्वाळांसह ती युवती कार्यालतही शिरली होती. जिल्हा रुग्णालयात केले दाखल पोलीस अधीक्षक कार्यालयात उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ आग विझवून या युवतीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर तेथून तिला कानपूरच्या लाला लजपतराय हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. या युवतीचे अवधेशसोबत प्रेमसंबंध होते. तिने २ ऑक्टोबर या दिवशी अवधेशवर तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर तिने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलीस अधीक्षक विक्रांत वीर यांनी दिली.