दणदणीत विजयानंतर विंडीजला ICC कडून दंडाचा दणका - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, December 17, 2019

दणदणीत विजयानंतर विंडीजला ICC कडून दंडाचा दणका

https://ift.tt/2PsrqPV
चेन्नई: एखाद्या संघाने विजय मिळवल्यानंतर त्याला बक्षिस दिले जाते किंवा पुरस्कार दिला जाते. पण विजयानंतर दंड झाल्याचे तुम्ही कादाचित ऐकले नसेल. क्रिकेटमधील एका संघाला विजयानंतर मोठा फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे (ICC)ने संघातील प्रत्येक खेळाडूच्या मानधनाच्या ८० टक्के दंड केला आहे. चेन्नईत भारत विरुद्ध झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिज (West Indies) ने ८ गडी राखून शानदार विजय मिळवला. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचे पारडे जड होते. भारताने प्रथम फलंदाजी करत २८८ अशी समाधानकारक धावसंख्या उभी केली होती. पण हेटमायर आणि होप यांची शतकी खेळीने वेस्ट इंडिजने सहज विजय मिळवला. या विजयानंतर वेस्ट इंडिजच्या खेळाचे सर्व जण कौतुक करत आहेत. वाचा- भारता (India) विरुद्धची टी-२० मालिकेत पराभव झाल्यानंतर विंडीजने पहिल्याच वनडेमध्ये विजय मिळवला. या विजयानंतर आयसीसीने मात्र त्यांना मोठा दणका दिला आहे. आयसीसीचे मॅच रेफरी (सामनाधिकारी) डेव्हिड बून यांनी संधगतीने षटके टाकल्याबद्दल दंड केला आहे. वेस्ट इंडिजने भारताविरुद्द गोलंदाजी करताना निर्धारित वेळेत चार षटके कमी टाकली होती. यामुळे बून यांनी कर्णधार पोलाड (Kieron Pollard)सह संपूर्ण संघाला दंड केला आहे. वाचा- खेळाडू आणि संघातील अन्य स्टाफसाठीची असलेल्या आचारसंहित २.२२ नुसार प्रत्येक संघाला विशिष्ठ वेळेत षटके टाकायची असतात. या निर्धारित वेळेत जर षटक टाकली गेली नाहीत तर प्रत्येक ओव्हर २० टक्के रक्कम दंड म्हणून केला जातो. वेस्ट इंडिजच्या संघाल देखील याच नियामाचा फटका बसला आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात संधगतीने षटके टाकल्याबद्दल संघातील प्रत्येक खेळाडूला ८० टक्के दंड करण्यात आला आहे. ही रक्कम त्यांच्या मानधनातून घेतली जाणार आहे. पोलार्डने मान्य केली चूक संधगतीने गोलंदाजी केल्याबद्दलची चूक वेस्ट इंडिजचा कर्णधार पोलार्डने मान्य केली. तसेच आयसीसीने केलेला दंड देखील स्विकारला. या प्रकरणी आम्ही आयसीसीला कोणतीही विनंती करणार नाही. पहिल्या वनडेत वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने ५० षटकात ८ बाद २८८ धावा केल्या. भारताकडून श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी अनुक्रमे ७० आणि ७१ धावा केल्या. भारताची आघाडीची फळी लवकर बाद झाल्यानंतर या दोघांनी शतकी भागिदारी करत संघाच्या डावाला आकार दिला होता. भारताने दिलेले विजयाचे लक्ष्य वेस्ट इंडिजने ४८व्या षटकातच पार केले. हेटमायर याने १३९ तर होपने नाबाद १०२ धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाटी २१८ धावांची भागिदारी केली. वेस्ट इंडिजकडून भारताविरुद्ध झालेली ही दुसऱ्या क्रमांकाची मोठी भागिदारी ठरली आहे. दोन्ही संघातील दुसरा सामना १८ डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे.