
कटक: भारतीय क्रिकेटचा कर्णधार विराट कोहलीची () ओळख 'रन मशिन' अशी केली जाते. प्रतिस्पर्धी संघ कोणताही असो आणि सामना टी-२०, वनडे किंवा कसोटी विराटच्या बॅटमधून धावांचा पाऊस होतोच. पण सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेत मात्र विराट धावा करण्यात अपयशी ठरला. या खराब कामगिरीमुळे विराटने वर्षभर केलेल्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या () वनडे मालिकेत विराटला फार खास कामगिरी करता आली नाही. पहिल्या सामन्यात विराट चार धावांवर तर दुसऱ्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला. विराट तब्बल दोन वर्षानंतर पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात धावा न केल्याने विराट सलग तिसऱ्या वर्षी वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता येणार नाही. वाचा- विराट गेल्या दोन वर्षापासून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. या वर्षी देखील त्याच्याकडे ही संधी होती. पण विंडीजविरुद्धच्या सलग दोन सामन्यातील अपयशामुळे विराटला टॉपवर राहता येणार नाही. मालिकेत रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यात १५९ धावा केल्या होत्या. या खेळीने रोहितने विराटला मागे टाकले होते. सध्या रोहितच्या १ हजार ४२७ धावा तर विराटच्या १ हजार ३०३ धावा झाल्या आहेत. दोघांमधील धावांचे अंतर १२४ इतके आहे. रोहित शर्मा देखील दमदार खेळत आहे. त्यामुळे तिसऱ्या वनडेत हे अंतर पार करणे विराटला शक्य होईलच असे नाही. वाचा- २०१७ आणि २०१८मध्ये विराटने वनडेत सर्वाधिक धावा केल्या होत्या. गेल्या वर्षी म्हणजे २०१८मध्ये विराटने १ हजार २०२ तर रोहितने १ हजार ३० धावा केल्या होत्या. त्याआधी २०१७मध्ये त्याने १ हजार ४६० तर रोहितने १ हजार २९३ धावा केल्या होत्या. विराटसाठी अनलकी मैदान वेस्ट इंडिजविरुद्ध होणारा तिसरा सामना कटक येथील बाराबती स्टेडियममध्ये होणार आहे. या मैदानावर विराटची कामगिरी फार चांगली नाही. विराटने या मैदानावर तीन वनडे आणि एक टी-२० सामना खेळला आहे. त्यात त्याने ३, २२, १ आणि ८ अशा धावा केल्या आहेत. भारतातील अन्य कोणत्याही मैदानापेक्षा हे मैदान विराटसाठी सर्वात अनलकी ठरले आहे.