बिबट्याला ठार मारून त्याच्या मांसाचं गावजेवण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, January 11, 2020

बिबट्याला ठार मारून त्याच्या मांसाचं गावजेवण

https://ift.tt/307whKi
गुवाहाटी, आसामः गावात घुसलेल्या बिबट्याला ठार मारून त्याच्या मांसाचं गावजेवण घातल्याची घटना समोर आली आहे. आसाममधील दिब्रुगढ जिल्ह्यातील दिलीबरी गावात गरुवारी ही घटना घडलीय. ठार केलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात चराईदेव जिल्ह्यातील एका गावात पाच जण जखमी झाले होते. बिबट्याने गुरुवारी चराईदेव जिल्ह्यातील एका गावात हल्ला केला. या हल्ल्यात गावातील पाच जण जखमी झाले. यावेळी गावकऱ्यांनी बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण नदी उडी मारून बिबट्या पोहत पलिकडे गेला. हा बिबट्या दिलीबारी गावात घुसला. यावेळी गावकऱ्यांनी बिबट्याला घेरलं. काठ्यांनी मारून त्याला ठार केलं. यानंतर बिबट्याचे तुकडे - तुकडे केले. चहाच्या मळ्यात बिबट्याचं मांस शिवजवून गावजेवण घालण्यात आलं, असं दिलीबरीतील एका गावकऱ्यानं सांगितलं. दिचांग नदीच्या एका बाजूला दिब्रुगढ दुसऱ्या बाजूला चराईदेव जिल्हा आहे. दिचांग नदी पोहून ओलांडल्याने बिबट्या थकला होता. यामुळे तो आमच्या तावडीत सापडला, असं गावकऱ्यानं सांगितलं. जंगलातील वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असल्याने वन्यप्राणी गावांमध्ये घुसण्याच्या घटना घडत आहेत. हे आता नित्याचं झालं आहे. पण या घटनेची आण्ही चौकशी आम्ही करत आहोत, असं दिब्रुगढमधील वनअधिकारी शंतनू गोगोई यांनी सांगितलं. डिसेंबर २०१७मध्ये अशीच घटना घडली होती. बिबट्याला ठार मारून गावजेवण घालण्यात आलं होतं.