ठाणे: मुंब्रात सात गोडाऊनला भीषण आग - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, January 7, 2020

ठाणे: मुंब्रात सात गोडाऊनला भीषण आग

https://ift.tt/2N2eNd3
ठाणे: शिळफाटाजवळील खान कंपाऊंड येथील सात गोदामांना भीषण आग लागली. रात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या भीषण आगीत सातही गोदामे जळून खाक झाली आहेत. खान कंपाऊंडमध्ये काही गोदामे आहेत. या लागली. आगीचे नेमके कारण समजले नाही. आग भीषण असल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना प्रयत्न करावे लागले. आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार वॉटर टँकर व दोन जंबो वॉटर टँकर, दोन रेस्क्यू व्हॅन तसेच आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते. रात्री ०२:१८ वाजता खान कंपाऊंड, शिळफाटा, मुंब्रा येथे एकूण ७ गोडाऊनला आग लागली आहे. ठाणे फायर ब्रिगेडच्या ३ फा. वा., २ रेस्क्यू वाहन, ४ वॉटर टँकर व २ जंबो वॉटर टँकर तसेच आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी व पोलिस अधिकारी उपस्थित आहेत. सकाळपर्यंत कुलिंगचे काम चालू होते. आगीत सात गोदामे जळाली असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिळफाटा परिसरात गोदामांना वारंवार आगी लागत आहेत.