मुंबई: दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांना आज सकाळीच पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनंतर या आंदोलकांना आझाद मैदानात नेण्यात आले. पाहुयात, राज्यात आणि देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाबाबतचे क्षणोक्षणीचे अपडेट्स... लाइव्ह अपडेट्स... >> ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना पोलिसांनी आझाद मैदानात नेले >> काही आंदोलक अजूनही 'गेट वे' येथेच असून ही जागा रिकामी करावी, असे आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येत आहे. >> दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे रविवारी मध्यरात्रीपासून ठाण मांडून बसलेल्या आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात.