मुंबई: ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी टी-२० वर्ल्ड कपसाठीची तयारी आताच सुरू झाली आहे. पुढील काही महिन्यात सर्वच संघ वर्ल्ड कपसाठीचा संघ निश्चित करतील. या स्पर्धेत भारतीय संघाकडे संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात आहे. सध्याचा फॉर्म विचारात घेता भारतीय संघ टी-२० वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवू शकतो. भारताच्या या वर्ल्ड कप मोहीमेसाठी कर्णधार विराट कोहलीने () एक सरप्राइझ पॅकेज दिले आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने टी-२० वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) कर्नाटकचा एक गोलंदाज सरप्राइझ पॅकेज असल्याचे सांगत सर्वांना अश्चर्याचा धक्का दिला. कर्नाटकचा () आगामी टी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वांना धक्का देऊ शकतो, असे संकेत विराटने दिले आहेत. कृष्णाचा सध्या तरी भारतीय संघात समावेश केला जाईल अशी चर्चा नाही. कृष्णा हा वर्ल्ड कपसाठी सरप्राईझ पॅकेज असू शकतो, असे विराटने म्हटले असले तरी त्याचा अद्याप भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. आगामी न्यूझीलंड दौऱ्यात कृष्णाला भारताच्या मुख्य संघात संधी मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण कृष्णाची अद्याप भारताच्या अ संघात निवड झालेली नाही. टीम इंडियाचा मुख्य गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि दीपक चाहर मोठ्या कालावधीसाठी दुखापतीमुळे संघातून बाहेर आहेत. त्यामुळे भारताला एका अतिरिक्त गोलंदाजाची गरज आहे. यामुळेच कोहलीने कृष्णाचे नाव घेतले असावे अशी चर्चा आहे. धमाकेदार कामगिरी... कर्नाटकच्या २३ वर्षीय प्रसिद्ध कृष्णाने भारताच्या अ संघाकडून दमदार कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये कृष्णा कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो. प्रथम श्रेणीच्या सामन्यात कृष्णाने ४१ वनडे सामन्यात ६७ विकेट तर २८ टी-२० सामन्यात २४ विकेट घेतल्या आहेत. २०१५मध्ये केली होती कमाल बांगलादेशचा अ संघ २०१५मध्ये भारताच्या दौऱ्यावर आला होता. म्हैसूरमध्ये कर्नाटकचा बांगलादेशच्या अ संघाविरुद्ध सामना झाला. या सामन्यात १९ वर्षीय कृष्णाने पहिल्या डावात पाच तर दुसऱ्या डावात एक विकेट घेतली होती. बांगलादेशविरुद्धच्या या कामगिरीमुळे कृष्णाला प्रथम प्रसिद्ध मिळाली होती. विशेष म्हणजे बांगलादेशविरुद्धचा कृष्णाचा हा पहिला प्रथम श्रेणीचा सामना होता. IPLमधील कामगिरी २०१८मध्ये कृष्णाने IPLमध्ये पदार्पण केले. २०१८ आणि २०१९मध्ये तो कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळला. १८ सामन्यात त्याने १४ विकेट घेतल्या. प्रथम श्रेणीतील शानदार कामगिरीमुळेच २०१८च्या इंग्लंड दौऱ्यात भारतीय अ संघात त्याची निवड झाली होती. ग्लेन मॅग्राकडून मार्गदर्शन कृष्णाने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत ८ सामन्यात १७ विकेट घेतल्या होत्या. सौराष्ट्र विरुद्ध १७ धावा देत ५ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. पण उपांत्य फेरीनंतर तो एकही सामना खेळू शकला नाही. फिटनेसमुळे न्यूझीलंडच्या दौऱ्यात भारताच्या अ संघात त्याला स्थान मिळाले नाही. २०१७मध्ये चेन्नईत एमआरएफ पेस फाउंडेशनमध्ये ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅग्राकडून कृष्णाने ३ महिने प्रशिक्षण घेतले होते.