'छपाक'साठी दीपिका सिद्धिविनायकाच्या चरणी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, January 10, 2020

'छपाक'साठी दीपिका सिद्धिविनायकाच्या चरणी

https://ift.tt/37UHWP0
मुंबई- दीपिका पदुकोणसाठी आजचा दिवस फार महत्त्वपूर्ण आहे. आज तिचा बहुप्रतिक्षित '' सिनेमात प्रदर्शित झाला. सिनेमा प्रदर्शित होताच दीपिका सिद्धिविनायक मंदिरात गजाननाच्या दर्शनाला गेली. दीपिका तिच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या क्षणी ती सिद्धिविनायक मंदिरात जाते. दीपिकाने यावेळी क्रीम रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. ड्रेसला साजेसे हेवी वेट कानातलेही तिने घातले होते. 'छपाक' सिनेमात दीपिकासोबत विक्रांत मेसी मुख्य भुमिकेत आहे. सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा अॅसीड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवाल यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. मेघना गुलझार यांनी दिग्दर्शन केलेला हा सिनेमा आज १० जानेवारीला प्रदर्शित झाला. याशिवाय आजच अजय देवगण, काजोल आणि सैफ अली खान यांचा 'तानाजी:द अनसंग वॉरीअर' सिनेमाही प्रदर्शित झाला. रणवीर सिंगने केलं दीपिकाचं कौतुक- छपाक सिनेमा पाहिल्यानंतर रणवीरने दिग्दर्शक आणि दीपिकाचं भरभरून कौतुक केलं. दीपिकासाठी रणवीरने लिहिलं की, 'मी तुला या भूमिकेसाठी मेहनत करताना पाहिलं आहे. तू या सिनेमाचं इंजिन आणि आत्मा आहेस. हा तुझ्या आतापर्यंतच्या करिअरमधला सर्वात महत्त्वपूर्ण सिनेमा आहे. असंच प्रामाणिकपणे काम करत रहा. तुझा परफॉर्मन्स खूप सुंदर होता. मालतीकडून तुला जे मिळालं ते हैराण करणारं आहे. मला तुझा याहून जास्त अभिमान यापूर्वी वाटला नव्हता. आय लव्ह यू.'