राशी भविष्य: कसा जाईल आजचा दिवस, पाहा! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, January 15, 2020

राशी भविष्य: कसा जाईल आजचा दिवस, पाहा!

https://ift.tt/2TsvRN9
- पं. डॉ. संदीप अवचट मेष : प्रिय व्यक्तीकडे दुर्लक्ष करू नका. वरिष्ठांना घरी बोलावण्याचा बेत रद्द करावा लागेल. मनाची तयारी नसताना काही कामे करावी लागतील. वृषभ : अनावश्यक बडबड व्यवसायातील प्रगती रोखेल. महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यापूर्वी समतोल विचार करा. संध्याकाळ अविस्मरणीय असेल. मिथुन : आर्थिक गुंतवणूक करताना जाहीर प्रदर्शन नको. मित्रांशी गैरसमजातून वैर पत्करू नका. घाईने प्रतिक्रिया देणे टाळा. कर्क : प्रकृतीच्या कुरबुरी चालू राहतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावी लागतील. परिवारातील सदस्यांना भावनिक आधार द्यावा लागेल. सिंह : चुकीच्या निर्णयामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. कामाच्या ठिकाणी जादा वेळ काम करावे लागेल. जोडीदाराची नाराजी पत्कराल. कन्या : सौंदर्य प्रसाधनांवर खर्च कराल. पूर्वी केलेले एखादे काम मानसन्मान मिळवून देईल. समारंभाचे आयोजन कराल. तुळ : आजचा तुमचा वेळ फक्त कुटुंबासाठी खर्च करा. सर्वांना मदत करण्याची तुमची सवय खूप समाधान देईल. आवडते काम पूर्ण होईल. वृश्चिक : अकारण संतापणे नको. गृहकर्जाचे काम होईल. कुटुंबातील लहान व्यक्तीबरोबर वेळ घालविण्याने मानसिक ताण विसराल. धनु : बचतीने नवे मार्ग सुचतील. आज सकारात्मक ऊर्जेने घोडदौड कराल. प्रलंबित कामांना अंतिम रूप द्याल. मकर : फुशारकी मारू नका. कोणावरही विसंबणे नको. स्वार्थ जपणाऱ्या लोकांशी मैत्री करू नका. कुंभ : घरगुती नात्यामध्ये व्यावसायिक संबंध नकोच. कार्यालयीन कामकाजात चालढकल करू नका. वैवाहिक आयुष्यात सर्वकाही आलबेल असेल. मीन : विवाहबंधनात बांधले जाल. अनपेक्षित लाभ होतील. कौटुंबीक अडचणी प्रथम सोडवा.