राजस्थानात 'घुंघट हटाव'; महिलांमध्ये जनजागृती - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, January 15, 2020

राजस्थानात 'घुंघट हटाव'; महिलांमध्ये जनजागृती

https://ift.tt/30jfvYI
वृत्तसंस्था, जयपूर राजस्थानात या महिन्यात होणाऱ्या पंचायत निवडणुकीत मतदानासाठी येणाऱ्या महिलांनी डोक्यावर पदर घेण्याची प्रथा दूर सारावी, यासाठी त्यांना उद्युक्त करण्यात येणार आहे. महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने 'घुंघट हाटव' मोहिमेअंतर्गत महिलांमध्ये ही जनजागृती करण्यात येणार आहे. राजस्थानच्या ग्रामीण भागांत महिलांमध्ये अजूनही डोक्यावर पदर घेण्याची प्रथा आहे. राजस्थानचे मुख्यमुंत्री अशोक गेहलोत यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात घुंघट आणि बुरखा प्रथेचे निर्मूलन करण्यात यावे, असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर महिला आणि बालकल्याण विभागाने महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी ही मोहीम सुरू केली आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार असून, यासाठी तळागाळातील कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आदींना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात येणार आहे. 'आमचे तळागाळातील कार्यकर्ते, साथीन, महिला बचतगटांतील सदस्य आणि स्थानिक महिला दरशुक्रवारी विविध विषयांवर बैठक घेत असतात. अशा बैठकांमध्ये दरमहिन्याच्या एका शुक्रवारी 'घुंघट'च्या मुद्द्यावर चर्चा केली जाते,' असे महिला आणि बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांच्या 'चौपाल रात्री'मध्येही ''चा संदेश दिला जातो, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.