पुस्तकाचा वाद संपला; जुनी मढी उकरू नका: शिवसेना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, January 15, 2020

पुस्तकाचा वाद संपला; जुनी मढी उकरू नका: शिवसेना

https://ift.tt/30nkjwj
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त पुस्तकाच्या निमित्ताने नेते, माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर कडक शब्दांत हल्ला चढवल्यानंतर बॅकफूटवर आली आहे. ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावरून महाराष्ट्रात संतापाची लाट उठल्यावर भाजपवाल्यांना नमते घ्यावे लागले. या वादावर आता पडदा पडावा आणि वाद संपल्यावर कुणी पुन्हा जुनी मढी उकरून काढू नयेत हीच अपेक्षा आहे,' असं आवाहन शिवसेनेने केलं आहे. '' या पुस्तकात शिवाजी महाराजांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्यात आल्यानंतर शिवसेनेने शिवाजी महाराजांच्या वंशजांनीच त्यावर बोलावे अशी खोचक प्रतिक्रिया दिली होती. त्यावर उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर हल्ला चढवला होता. शिवसेनेच्या स्थापनेवेळी 'शिवसेना' हे नाव ठेवताना शिवाजी महाराजांच्या वंशजांना विचारलं होतं का? वडापावला शिवाजी महाराजांचं नाव का दिलं? असे सवाल उदयनराजे यांनी केले होते. त्यावर उदयनराजे यांचं नाव न घेता शिवसेनेने दैनिक 'सामना'तून सावरासावर केली आहे. शिवसेना सोयीप्रमाणे भूमिका बदलत नाही. सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्यांनी व शब्द फिरवणाऱ्यांनी याचे भान ठेवले पाहिजे. शिवाजी महाराजांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न जेव्हा जेव्हा उभा राहिला तेव्हा तेव्हा महाराष्ट्र खडबडून जागा झाला व पेटून उठला. पंडित नेहरू असतील, नाहीतर मोरारजी देसाई, सगळ्यांनाच शिवरायांपुढे नतमस्तक व्हावे लागले. आताही तेच झाले. ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावरून महाराष्ट्रात संतापाची लाट उठल्यावर भाजपवाल्यांना नमते घ्यावे लागले. या वादावर आता पडदा पडावा आणि वाद संपल्यावर कुणी पुन्हा जुनी मढी उकरून काढू नयेत हीच अपेक्षा आहे, असं शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे. अग्रलेखात काय म्हटलंय >> भाजप म्हणते, लेखक गोयल याने पुस्तक मागे घेतले, पण हा उपटसुंभ गोयल म्हणतोय, ‘छे, छे. मी पुस्तक मागे घेतले नाही, घेणार नाही.’ आता नव्याने लेखक म्हणतो, मी पुस्तकाचे पुनर्लेखन करणार. म्हणजे गोंधळ सुरूच आहे. गोयल याला जे ओळखतात ते ठामपणे सांगू शकतात की, हा माणूस खोट्या प्रसिद्धीचा भुकेला आहे व यानिमित्ताने त्याला ती प्रसिद्धी मिळाली आहे. आणखी काही काळ त्याला ही प्रसिद्धी मिळू शकेल. >> केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता असे जाहीर केले की, ‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा देण्यात आल्या. अशा घोषणा देणाऱ्यांना तुरुंगात पाठवू.’ अशा वक्तव्यांमुळेही लोकांच्या भडकलेल्या भावना आणखी पेटत असतात. बरं, असे जर असेल तर भाजप कार्यालयात ‘नरेंद्र मोदी हेच शिवाजी’ असे सांगणाऱ्या लेखकावर त्याच कायद्याने कारवाई का झाली नाही? कारण याच प्रकरणामुळे राज्यातले वातावरण पेटले आहे. ते प्रकरण भीमा-कोरेगाव दंगलीसारखे होऊ नये इतकीच आमची अपेक्षा आहे. >> पुस्तकामुळे भडका उडाला व लोकांच्या भावनांचा उद्रेक झाला. हे सर्व जाणूनबुजून करणाऱ्या फुटकळ लेखकाला भाजपातून एव्हाना हाकलून का दिले नाही? या ठिकाणी तुमचे ते व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आडवे येते, पण जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अशा स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांची डोकी फोडली जातात व त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. कानपूरला फैज अहमद फैज यांच्या एका कवितेवरून भाजप समर्थकांनी वाद पेटवला आहे, पण ‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ हा वादाचा विषय आहे असे कुणाला वाटत नाही. >> सुधीर मुनगंटीवार यांनी एक बाळबोध प्रश्न विचारला आहे, ‘पवारांना जाणता राजा कसे म्हणता?’ हा प्रश्न त्यांनी नरेंद्र मोदी यांनाच विचारायला हवा. छत्रपती शिवरायांना ‘रयतेचा राजा’ असे संबोधले जात असे. जनतेच्या प्रश्नांबाबत व भावनांबाबत खडा न् खडा माहिती असलेला लोकनेता म्हणजे ‘जाणता राजा’ हे पवारांच्या बाबतीत नरेंद्र मोदी यांनीच मान्य केले. त्यामुळे मुनगंटीवार यांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मोदीच देतील. पवार जाणता राजा कसे? असा प्रश्न उभा केल्याने 'आज के शिवाजी: नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून भडकलेल्या वादाची आग कमी होणार नाही. मधल्या काळात भाजपच्या काही नेत्यांच्या मागेही ‘जाणते राजे’ अशा उपाध्या हौसेने लावण्यात आल्या. पण कुठे शिवाजी राजे व कुठे हे सर्व हवशे नवशे गवशे! याआधी जेम्स लेनच्या पुस्तकावरून महाराष्ट्र पेटलाच होता व आता देशी लेनने शिवरायांची अस्मिता पणाला लावली आहे. >> चंद्रकांत पाटील यांनी या निमित्ताने वीर सावरकरांच्या बदनामीचा प्रश्न उपस्थित केला आहे. शिवरायांच्या बदनामीवर जे चिडले ते वीर सावरकरांच्या बदनामीवर का भडकले नाहीत? पाटलांचा प्रश्न निरर्थक आहे. शिवसेनेने सावरकरांच्या संदर्भात ठाम भूमिका नेहमीच घेतली. नव्हे, फक्त शिवसेनेनेच घेतली. केंद्रात भाजपचे सरकार आहे. वीर सावरकरांना तत्काळ ‘भारतरत्न’ द्यावे, राष्ट्रपुरुषांच्या नामावलीत वीर सावरकरांना समाविष्ट करावे व वीर सावरकरांवर जो घाणेरडे विधान करील त्यावर खटले दाखल करण्याचे फर्मान केंद्रीय गृह मंत्रालयाने काढावे. हे करणार आहात का? सावरकरांची तुलनाही शिवरायांशी करता येणार नाही. वीर सावरकरांच्या संदर्भात शिवसेनेने घेतलेल्या ठाम भूमिकेच्या आसपासही कोणी फिरकू शकले नाही.