'सारथी'साठी खासदार संभाजीराजेंचे उपोषण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, January 11, 2020

'सारथी'साठी खासदार संभाजीराजेंचे उपोषण

https://ift.tt/30fe6SP
पुणेः छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्वायत्तता अबाधित ठेवावी, यांसह विविध मागण्यांसाठी यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आणि सारथीच्या विद्यार्थ्यांनी आगरकर रस्त्यावरच ठिय्या देत लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. या वेळी सारथीला मोठ्या प्रमाणात निधी द्या, प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांच्यावर कारवाई करा, असे फलकही आंदोलकांनी झळकविले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत सारथी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरेही उपोषणाला बसलेत. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेवर (सारथी) लादलेल्या निर्बंधांविरोधात मराठा क्रांती मोर्चाने उपोषणास्त्र उगारले आहे. 'सारथी' संस्थेची व्यथा मांडण्यासाठी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या आगरकर रस्त्यावरील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केलंय. खासदार संभाजीराजे छत्रपती, 'सारथी'चे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे हे या उपोषणात सहभागी झाले आहेत. मराठा-कुणबी समाजाच्या आर्थिक सामाजिक व शैक्षणिक सक्षमीकरणासाठी स्वायत्त अधिकार छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्थापना राज्य सरकारने केली होती. राज्य सरकारने 'बार्टी'च्या धर्तीवर 'सारथी' संस्थेची स्थापन केली होती. 'सारथी' संस्थेला मराठा समाजासाठी आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीच्या विविध योजना राबवण्यासाठी कंपनी कायद्यानुसार स्वतंत्र अधिकार देण्यात आले होते. त्याबाबतचा धोरणात्मक निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. पण मंत्रालयातील सरकारी अधिकाऱ्यांनी या स्वायत्त संस्थेवर अंकुश ठेवताना संस्थेच्या अधिकारांना लगाम लावण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे हे आंदोलन हे आंदोलन करण्यात येत आहे.