
मुंबई: आज सकाळी सायन आणि माटुंग्या दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने मुंबईकरांची लाइफलाइन असलेली मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी रेल्वेचा खोळंबा झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. तर दुसरीकडे रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीचं काम तातडीने हाती घेतलं आहे.